दोन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन;मतदारसंघाचा कायापालट करू : आ.मनोहर चंद्रिकापुरे

0
14

अर्जुनी-मोरगाव : मतदारराजाने निवडून दिले. विकासकामे व्हावीत ही त्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षांना कुठेही तडा जाणार नाही. प्रांजळपणे गावातील विकासकामे सांगा. मतदारसंघाचा आपण कायापालट करू, असे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.त्यांनी बाकटी, सोमलपूर, बिडटोला, कोहलगाव, प्रतापगड व जानवा या गावात १.८० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी केले. याप्रसंगी ते बोलत होते.

अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे. ग्रामीण व दुर्गम भागात दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे नूतनीकरण व मजबुतीकरण आवश्यक आहे. या समस्या अनेकदा कानावर येत होत्या. आपण मतदारसंघातील अनेक रस्ते व पुलांची कामे मार्गी लावून त्यासाठी निधी खेचून आणला आहे. काही कामे सुरू झाली आहेत. काही कामांबाबत पाठपुरावा सुरू आहे. रस्ता बांधकामांच्या कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिल्या. कोहलगाव व जानवा या गावात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. क्षेत्राचा कायापालट करणार असे सांगितले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मागण्या पूर्ण करण्याविषयी त्यांनी आश्वासित केले.

यावेळी गोंदिया जिपचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जिप सदस्य जयश्री देशमुख, पंस सदस्य पुष्पलता द्रुगकर, आम्रपाली डोंगरवार, नाजूक कुंभरे, जानवाचे सरपंच किशोर ब्राह्मणकर, प्रतापगडचे सरपंच भोजराम लोगडे, कोहलगावच्या सरपंच माधुरी चांदेवार, बाकटीचे सरपंच भानुदास वडगाये, सोमलपूरचे सरपंच निलू खुणे, उपसरपंच बडवाईक, हर्षला राऊत, संध्या शेंडे, योगेश जनबंधु, जितेंद्र कापगते, बळीराम टेंभूर्णे, रामेश्वर घुग्गुस्कर, कांतीलाल डोंगरे, संजय रामटेके व ग्रामस्थ उपस्थित होते.