
गोंदिया,दि.08ः-शहरातील रामनगर पोलीस स्टेशनंतर्गतच्या परिसरात गणेशोत्सव मूर्ती विसर्जना दरम्यान शांतता अबाधित राहावी.रामनगर पोलिसांच्यावतीने रुट मार्च काढून शांततेचे आवाहन करण्यात आले.आज गुरुवारला सकाळी 10.30 ते 11.30 कालावधीत रामनगर बाजार चौक ,दीनदयाल वार्ड ,मनोहर कॉलनी, काली मंदिर, इओएस सिनेमा , पाल चौक ,राजलक्ष्मी चौक, बिरजू चौक, परत रामनगर पोलीस स्टेशन या मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. तसेच पो.स्टे.परिसरातील पाल चौक येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.यावेळी पोलीस स्टेशन रामनगरचे पाच अधिकारी ,46 पोलीस अमंलदार ,म.पो.उप.नी.सुरनर मॅडम, सी60 तुमडाम पथकाचे 16 अमलदार व 55 गृह रक्षक हजर होते.