
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाचे ०४ जुलै, २०२२ च्या पत्रानुसार मतदार यादीतील मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याबाबत पत्र निर्गमित केले आहे. गोंदिया जिल्हयात ०१ ऑगस्ट, २०२२ पासून ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून मतदार यादीतील मतदारांना आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी अर्ज क्रमांक 6 ब मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.
“चला, मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या मतदार यादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करु या! या घोष वाक्य नुसार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये ११ सप्टेंबर, २०२२ (रविवार) रोजी राज्यव्यापी आधार जोडणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून गोंदिया जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर ११ सप्टेंबर, २०२२ (रविवार) रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत मतदार यादीतील मतदारांना आधार क्रमांक जोडणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6ब, NVSP, VHA व VPORTAL या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यांत आले असून जिल्हयातील मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नयना गुंडे यांनी केेले आहे.