रेंगेपार/दल्ली येथे राष्ट्रीय पोषण कार्यक्रम संपन्न

0
37

सडक अर्जुनी,दि.10 – तालुक्यातील रेंगेपार/दल्ली येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावाचे आयोजन चंद्रकला डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य, शेंडा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात अंगणवाडी केंद्र कलारीटोलाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती यांच्या हस्ते करण्यात आले. पोषण मेळाव्यात आदिवासी भागातील पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. याप्रसंगी बाल कल्याण सभापती यांनी उपस्थित महिला व किशोरवयीन मुली यांना योग्य मार्गदर्शन केले. आदिवासी भागातील पारंपरिक खाद्यपदार्थ शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत व त्यांचा समावेश आहारात आवर्जून करावा असे सांगून स्वस्थ नारी- सशक्त नारी अशी संकल्पना मांडली .
यावेळी उपस्थितांना डॉ. भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्य , शालिंदर कापगते उपसभापती, अल्लाउद्दीन राजानी, चेतन वळगाये, दिपाली मेश्राम, पंचायत समिती सदस्य, छाया टेकाम सरपंच यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेंढे बालविकास प्रकल्प अधिकारी, सूत्रसंचालन श्री नेवारे स.शि. व आभार प्रीती गेडाम पर्यवेक्षिका यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील नागरिक महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. सप्टेंबर २०२२ या महिन्यात पोषण अभियान अंतर्गत कार्यक्रम प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाणार असल्याची माहिती आहे.