Home विदर्भ राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे उद्या अधिवेशन

राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे उद्या अधिवेशन

0

नागपूर : महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने शनिवारी, २0 फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२.३0 वाजता या अधिवेशनाचे उद््घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर प्रवीण दटके उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोद्दार, म.रा.गा.पो.पा. संघटनेचे अध्यक्ष अँड. भिकाजी पाटील, महासचिव श्रीकृष्ण साळुंखे पाटील, कोकण विभागाचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, पुणे विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, संपर्कप्रमुख विठ्ठल सावंत पाटील, अमरावती विभागाचे अध्यक्ष उद्धवराव काळपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष चिंतामणी मोरे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष मधुकरराव पतंगे व सचिव कमलाकर मांगले उपस्थित राहतील, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी नागपूरचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे, भंडारा जिल्हाध्यक्ष भोलाराम साठवणे, विनायक ठाकरे, मुरारी दहीकर उपस्थित होते.

Exit mobile version