Home विदर्भ प्रशासनाने पारदर्शक व गतिमान सेवा निर्माण करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रशासनाने पारदर्शक व गतिमान सेवा निर्माण करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0

अमरावती दि. 2: वरुड तहसील कार्यालयासाठी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण, सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे. ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर, मेळावे- शिबिरांचे आयोजन याव्दारे नागरीकांना गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

 अद्ययावत असून याचा उपयोग प्रशासकीय कामे कार्यक्षमता गतीने पूर्ण करण्यासाठी व्हावा. नविन वास्तूतील प्रशस्त सभागृहात करून नागरीकांना दाखले व आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून दयावी. करून प्रशासनात पारदर्शकता आणावी, असे आवाहन

महसूलमंत्र्यांच्या हस्ते वरूड येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार  डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री विखे म्हणाले, तहसील कार्यालयात ई-फेरफार, ऑनलाईन सातबारा, सेतूच्या माध्यमातून प्राप्त होणारी विविध प्रमाणपत्रे, शैक्षणिक दाखले मिळविण्यासाठी सातत्याने वर्दळ असते. रोजगार हमीविषयक कामकाज, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजना आदी कामाचे व्यापक स्वरुप पाहता आधुनिक व प्रशस्त इमारतीत हे कामकाज अधिक प्रभाविपणे व्हावे. सर्वसामान्यांचे प्रश्न गतीने सोडवून प्रशासनाने मोलाची भुमिका पार पाडावी.

डॉ. बोंडे म्हणाले, नूतन तहसील इमारतीतील सभागृहात महिला बचत गटांचे कार्यक्रम, प्रशिक्षण आदींचे नियोजन करावे. बचतगटांनी निर्माण केलल्या विविध वस्तूंचे कायमस्वरुपी विक्री केंद्र येथे उभारण्यात यावे. तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कामकाजातून सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा.

महसुल मंत्र्यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण

सेवा हमी पंधरवड्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा मंत्री श्री विखे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जातप्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच विविध योजनांच्या लाभाचे वितरण महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ई-पीक पाहणी करण्यासाठी ग्रामसभेला हजर राहून विविध संकल्पना राबविणारे तलाठी प्रदिप अजमिरे, मतदान केंद्र अधिकारी रिना गिरी, कोतवाल संगिता घोरमाडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांचे पशुपालक मनोहर गोहत्रे व प्रविण भाजीखाये यांना मदतीचा धनादेशाचे देण्यात आला. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, वरूडचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे, प्रतिभा चौधरी, पंकज चव्हाण, प्रमोद राऊत, प्रमोद सोळंकी, आदी उपस्थित होते.

Exit mobile version