Home विदर्भ आरोग्य व हॉस्पिटलमधील रुग्णाच्या हक्काबाबत जनआरोग्य अभियान तर्फे कार्यशाळा

आरोग्य व हॉस्पिटलमधील रुग्णाच्या हक्काबाबत जनआरोग्य अभियान तर्फे कार्यशाळा

0

नागपूर,दि.04ः- येथील म्यूर मेमोरियल हाॅस्पिटलमध्ये जन आरोग्य व रुग्ण हक्काबाबत जन आरोग्य अभियान पुणे, नागरिक आरोग्य अधिकार मंच नागपुर, आम्ही आमच्या आरोग्यसाठी गडचिरोली, सीएनआई संस्था नागपुर इत्यादि संस्थाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.वैद्यकीय व्यवसायाला नोबल प्रोफेशन म्हणून ओळखले जाते. प्रामाणिकपणा,पारदर्शकता,रुग्णहित,संवेदनशिलता अशी अनेक मुल्ये वैद्यकीय सेवांमध्ये निहित आहेत.कोविडच्या काळात सरकारी आरोग्य व्यवस्थाची झालेली दुरावस्था व त्या अनुषंगाने खासगी आरोग्य व्यवस्थेने रुग्नांची केलेली अमाप लूट याबाबत जन आरोग्य व रुग्ण हक्काबाबत अस्तित्वात असलेले कायदे व अंमलबजावणी बाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. रुग्ण हक्काचे कायदे असतांना व सरकारने सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये rtpcr, remdesivar, ventilator, , oxygen, pathological tests, ct scan, medicine, bed charges इत्यादिचे दर पत्रक ठरवून दिले असतांना अवाजवी दर लावत रुग्णांची अक्षरशः लूट केली व मोठ्या प्रमाणात रुग्ण हककांचे उलंघन झाले. संविधानात मानवी मूलभूत हक्कमध्ये जगण्याचा हक्कासोबतच समनातेच्या तत्वावर शिक्षण, आरोग्य इत्यादि सुविधा पुरवण्याची जबाबदारी बाबत माहिती देण्यात आले.या कार्यशाळेला प्रमुख वक्ते डॉ.अभय शुक्ला (जन आरोग्य अभियान, पुणे), डॉ.सतीश गोगुलवार (आम्ही आमच्या आरोग्यसाठी, गडचिरोली), विलास शेंडे (म्युर मेमोरियल हॉस्पिटल, नागपुर),कॉ जम्मू आनंद (मनपा कर्मचारी महासंघ) इत्यादि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ अभय शुक्ला म्हणाले की “महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम 1949 (सुधारित 2021) अंतर्गत प्रत्येक हॉस्पिटलद्वारा “रुग्ण हक्काची सनद” चे पालन करीत हॉस्पिटलच्या दर्शनी भागात सेवा देणारे तदन्य डॉक्टर्स (शैक्षणिक पात्रतासह), सेवा विषयक माहिती, दर पत्रक (प्रवेश शुल्क, खाट/अति दक्षता कक्ष दर, वैद्यकीय शुल्क, शत्रक्रियागृह शुल्क, शुश्रुषा शुल्क, सलाइन व रक्त संक्रमण शुल्क, मल्टीपरा मॉनिटर शुल्क, पैथोलॉजी शुल्क, ऑक्सीजन शुल्क, रेडियोलॉजी व सोनोग्राफी शुल्क), तक्रार नोंद वही इत्यादि बाबी लिखित स्वरुपात असन्याची गरज असते. तसेच दवाखान्यात भर्ती झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत प्रत्येक स्टेजवर त्यांचे हक्क आहेत, ते जाणून घेण्याची गरज आहे.”

रुग्ण हक्क – 1) रुग्णाला आजाराचे निदान/शंका, स्वरूप व गंभीरता, दुष्परिणाम, अंदाजीत खर्च, दर पत्रक मिळवन्यचा हक्क आहे 2) उपचार व सेवासाठीचे दर पत्रक मिळन्याचा हक्क 3) विशिष्ट चाचणी व उपचार बाबत माहिती देवून रुग्णाची सन्मति घेणे 4) डॉक्टरांची माहिती दर्शनी भागात लावणे 5) रुगणांच्या नोंदी, केसपेपर, तपासणी रिपोर्ट व बिले मिळन्याचा हक्क 6) दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेण्याचा अधिकार 7) तक्रार करण्याचा हक्क 8) दर पत्रकानुसार सेवा घेण्याचा अधिकार 9) क्लिनिकल रिसर्च अंतर्गत औषधोपचाराचे दुष्परिणाम झाल्यास आर्थिक भरपाईची तरतूद 10) सुट्टी/डिस्चार्ज वा कोणत्याही कारणास्तव रुगणांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास हॉस्पिटल नाकारू शकत नाही. 11) 12) पुरुष डॉक्टरांनी महिला रुग्णाची तपासणी करतेवेळी एका स्त्री कर्मचारी/नातेवाईकाने सोबत असन्याचा हक्क 13) hiv बाधित रुग्णासोबत भेदभाव न करने 14) भेदभाव रहित उपचार मिळन्याचा हक्क 15) तातडीच्या / जख्मी रुग्णानां जीवरक्षक उपचार मिळन्याचा हक्क 16) वैद्यकीय नोंदी/माहितीचे डीजीटाईजेशन करण्यपूर्वी रुग्णाची सन्मति घेणे 17) औषधे कुठून घ्यावी वा चाचन्या कुठून करावया, हा सर्वस्वी अधिकार रुग्णाचा 18) क्लिनिकल ट्रायल साठी सहभागी रुग्णासाठी संरक्षण व भरपाईचा अधिकार 19) आरोग्य योजनाबाबत (महात्मा फुले जीवनदायी योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना, आयुष्यमान भारत, धर्मादाय दवाखाने) माहिती घेण्याचा अधिकार 20) तक्रारीची सुनावनी व तक्रार निवारण करण्याचा हक्क 21) योग्य ठिकाणी उपचारसाठी हस्तांतर करण्याचा हक्क

वरील निर्देशित रुग्णाचे हक्क व अधिकार जोपासन्यासाठी जसे हॉस्पिटल्स कायद्यने बंधनकारक आहेत. तसेच या हक्काची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा सर्व नागरिकांची आहे. त्यासाठी लागनाऱ्या अधिक माहितीसाठी “साथी संस्था, 140, फ्लैट 3 व 4, अमन इ टेरेस, डहानुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे-411038, फोन- 020 25472325 / 25473565, web- sathi what.org ” इथे संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी शकुंतला भालेराव, विनोद शेंडे, राजीव थोरात, रूपेश साईजारे, किरण ठाकरे, अरुण वनकर, दीनानाथ वाघमारे, शाइना, इत्यादि उपस्थित होते.

Exit mobile version