Home विदर्भ लोकेशच्या आत्महत्येची चौकशी करा- ओबीसी कृती समितीचे निवेदन

लोकेशच्या आत्महत्येची चौकशी करा- ओबीसी कृती समितीचे निवेदन

0

चंद्रपूर,दि२३-ओबीसी कृती समिती चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,राज्याचे अर्थमंंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन देऊन लोकेश विजय येरणे या ओबीसी विद्याथ्र्यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करून संबधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.लोकेशच्या आत्महत्येला सामाजिक न्याय मंत्रालयासह संबधित महाविद्यालय प्रशासन सुध्दा जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.ओबीसी गटात मोडत असलेल्या या विद्याथ्र्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असल्याने तो शिष्यवृत्तीसाठी पात्र होता.त्यानुसार त्याला ५० टक्के शुल्क लागते.परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्यास १०० टक्के शुल्क भरावयास सांगितले.५० टक्के रक्कम भरावयास तयार असतानाही नकार देत त्याचे कागदपत्र परत करण्यास नकार दिल्याने लोकेशला मानसिक धक्का बसला आणि त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला यामुळे यासर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून महाविद्यालय प्रशासनावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.यावेळी सचिन राजुरकर,बबन फंड,बबनराव वानखेडे,संतोष येरणे,सीमा येरणे,राहुल पावडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version