गोंदिया,दि.07ः- तालुक्यातील जिल्हा परिषद कुडवा क्षेत्र अंतर्गत खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून ग्राम बरबसपूरा येथे सभागृह बांधकाम,आंगणवाडी परिसरात सुरक्षा भिंत बांधकाम, ग्राम टेमनी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, ग्राम कुडवा येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. या उदघाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस मिळाले होते. खते, बी – बियाणांचे वाढलेले भाव, शेतीच्या मशागतीला लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ, यामुळे शेतकरी आकस्मिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धानाला प्रति क्विंटल १००० रुपये बोनस देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ईंजि.यशवंत गणवीर, बाळकृष्ण पटले, रमेश गौतम,जि.प.सभापती सौ.पूजा सेठ, अखिलेश सेठ, सौ. कीर्ती पटले, सौ. पायल बागडे, श्रीमती निर्मला आगडे, सौ. माधुरी तुरकर, शैलेश वासनिक, संतोष लिल्हारे, पन्नालाल डहारे, हंसराज हट्टेवार, सौ.वर्षा मलगाये, सौ.गीतावती नागपुरे, शिवलाल नेवारे, विनोद मेश्राम, राजेश आंबेडारे, छगनलाल नेवारे, शेखर किराणपुरे, धनेश पटले, सौ.सुनीता पटले, सौ. दुर्गाबाई नांदणे, सौ.शिलाबाई डहाट, सौ.विमलताई उईके, मनोज नागपुरे, गोविंद वासनिक, योगराज नागपुरे, मुलचंद दमाहे, रणजित बोरकर, राजेश नागपुरे, फागनलाल बिसेन, रमेश सोनवणे, ललित रहांगडाले, जीवनलाल नागपुरे, बंटीजी गौतम, सुनील पटले, भोजराज तुरकर, छोटुजी मरस्कोल्हे, महेस येड़े, सौ. डिलेश्वरी मरस्कोल्हे, सौ. मायाताई वासनिक, सौ. मीनाताई नागरीकर, सौ. सरिता रहांगडाले, सौ. ममताबाई बिसेन, योगेश पारधी, सायंसराम गराडे, सुरेश सोनवाने, सौ. स्वाति रहागंडाले ,सौ. रसीकाबाई गजभिये, सौ. सुजाताबाई डहाट,बाबुलाल मरस्कोल्हे, सुरेन्द्र दमाहे, भुमेस्वर मरस्कोल्हे कार्यकर्ता व ग्रामवासी उपस्थित होते.