( भिवखिडकी येथे साठ लाखाचे कामाचे भूमिपूजन )
अर्जुनी मोर. :-– गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजना आहेत.त्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत कमेटीने सजग राहणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रा.पं.कमेटीने गावाचा विकास आराखडा तयार करुन विवीध योजनेच्या माध्यमातून विकास करावा.आणी सुंदर रस्ते हिच गावाची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
तालुक्यातील मौजा भिवखिडकी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजुर साठ लाखाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी रचनाताई गहाणे ता.6 त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भिवखिडकी च्या सरपंच कविता गेडाम होत्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी विलास निमजे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नंदेश्वर रामटेके, पंचायत समिती सदस्या पुष्पलता द्रुगकर, ग्रामसेवक समीर रहांगडाले, तांत्रिक अधिकारी राकेश कटरे,उपसरपंच अरविंद नागपुरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामरोजगार सेवक असीम वासनिक व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते. भिवखिडकी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येकी पाच लाख प्रमाणे तिस लाखांच्या सहा सिमेंट रस्त्याचे बांधकाम तर प्रत्येकी पाच लाख प्रमाणे तिस लाखांच्या रस्ता खडीकरण कामाचे असे एकुन साठ लाखाच्या बारा कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे हस्ते करण्यात आले. संचालन उपसरपंच अरविंद नागपुरे यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवक समीर रहांगडाले यांनी केले.