गोंदिया, दि. 07 : राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार हे सोमवार 10 ऑक्टोबर 2022 रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
दुपारी 01 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 01.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथील शूटिंग रेंज उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 01.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवन कार्यालय भूमिपूजन कार्यक्रम, दुपारी 02 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेला उपस्थिती. सायंकाळी 04.30 वाजता रावणवाडी ता. गोंदिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण. 05.30 वाजता भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित व सोईनुसार नागपूरकडे प्रयाण.