स्वप्न झाले साकार, घरो-घरी पोहचणार थेट घरगुती गॅस

0
66
वाढदिवसाच्या शुभेच्छा

खासदार  प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाची फलश्रुति

गोंदिया,दि.-3ः- सन २०१३ मध्ये गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेक (गेल) या संस्थेने कॉम्प्रेस्ड (नॅचरल गॅस) चे परिवहनासाठी गुजरात ते उडीसा पर्यत भूमिगत गॅस पाईप लाईनचे जाळे पसरविण्याचा निर्णय घेतला होता. या महत्वकांक्षी प्रकल्पाचा लाभ गोंदिया-भंडारा दोन्ही जिल्हासह विदर्भातील जनतेला मिळावा यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी प्रयत्न सुरु होते. यासाठी खासदार पटेल हे सातत्याने संबंधित कंपनीच्या संपर्कात राहीले एवढेच नव्हेतर गोंदिया – भंडारा जिल्हासह विदर्भ देखील लाभान्वित व्हावा यासाठी त्यांनी कशली ही कसर सोडली नाही. परिणामी गेल कडून घरा-घरापर्यंत घरगुती गॅसचे जाळे पसरण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. या कामाला गती देण्याचे अनुषंगाने तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथे आवश्यक साहित्यचा पुरवठा सुरु झाला आहे. मुंबई – नागपूर – झारसुगुडा (MNJPL) या विस्तारीत प्रकल्पा अंतर्गत गोंदिया – भंडारा या दोन्ही जिल्ह्यात भूमिगत गॅस पाईप लाइनचे कामे होणार आहेत. सन २०१३ मध्ये खासदार पटेल यांनी पहिलेले स्वप्न आता साकार होणार आहेत. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे गोंदिया-भंडारा जिल्हाच नव्हेतर विदर्भातील अनेक जिले लाभावंत होणार आहे.

बदलत्या काळानुरुप आधुनिक औद्योगिक विकासाचे कामे ही वेगाने बदलत चालले आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साहित्य निर्मिती तथा निर्मित केलेल्या उत्पादनाची वाहतुक अत्यंत सोयस्कर व्हावी या दिशेने पाऊल ठेवत आहे आणि त्यासाठी गॅस हे महत्वपूर्ण ठरणार आहे. सन २०१३ मध्ये गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेक (गेल) या संस्थेने ग्राहकांची गॅस सिलेंडर परिवहनाची डोकेदुखी कमी करण्याच्या उद्देश्याने भुमिगत गॅस पाईप लाईन जाळे पसरविण्याचे निर्णय घेतले. प्राथमिक निर्णयात गुजरात ते उडीसा राज्य पर्यंत चा १५४० कि.मी.चा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. मात्र या महत्वकांक्षी प्रकल्पाचा लाभ गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हात मिळावा किंबहुणा विदर्भातील सर्व जिल्हांना मिळावा यासाठी पटेल यांनी संबंधित कंपनीसी पाठपुरावा केला. खासदार  पटेल हे या प्रकल्पा संदर्भात पाठपुरावा पर्यंतच न थांबता कोणत्याही परिस्थितीत घरगुती गॅस चे भूमिगत जाळे गोंदिया-भंडारा जिल्हा या माझ्या जिल्हयात पोहचावे यासाठी ते प्रयत्नरत राहीले. परिणामी गेल या कंपनी ने घरगुती गॅसचे भुमिगत जाळे पसरविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्पाच्या विस्ताराला हिरवी झंडी दिली. गेल या कंपनीने घरगुती – व्यापारिक तथा औद्योगिक गॅस पुरवठ्या साठी भुमिगत पाईप लाईन पसरविण्याचे कामे युध्द पातळीवर सुरु केले आहे. गोंदिया – भंडारा या दोन्ही जिल्हयापर्यंत भुमिगत पाईप लाईनचे कामे करण्याचे अनुषंगाने तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी या गावांत आज घडीला आवश्यक साहित्य पुरवठा ही सुरु झाला आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्पावर जवळपास २० हजार कोटी रुपयाहुन अधिकचा खर्च होणार आहे. यात महाराष्ट्र मध्ये ५१०० कोटी रुपयाहुन अधिकची निधी खर्चीत होणार आहेत. या महत्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र नॅचरल गॅस च्या माध्यमातुन राज्यात पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पाच्या मध्यमातुन सन २०१३ मध्ये खासदार पटेल यांनी पाहिलेले स्वप्न लवकरच साकार होणार आहेत. खासदार पटेल यांच्या प्रयत्नाची हि फलश्रुति असल्याने गोंदिया-भंडारा जिल्हयासह विदर्भ व खान देशातील जवळपास १२ जिल्हे लाभांवित होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी या औद्योगिक क्रांतीसाठी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले.

राज्यात ९६३ कि.मी.चे भुमिगत जाळे

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेक (गेल) वतीने भुमिगत गॅस परिवहनासाठी पाईप लाईनचे जाळे पसरविण्याच्या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन राज्यातील १२ जिल्हयांना जोडण्यात येणार आहे. राज्यात एकुण ९६३ कि.मी. अंतराचे पाईप लाईन जाळे पसरण्यिात येणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्हयात १०४ कि.मी. भंडारा २६, नागपुर १६४, वर्धा ६१, अमरावती ७४, वाशिम ९७, बुलढाणा जिल्हयात ८७ कि.मी. चे पाईप लाईन पसरण्यिात येणार आहे. याशिवाये ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व जालना या जिल्हयात ही भुमिगत पाईप लाईनच्या माध्यमतुन जनेत पर्यंत थेट गॅस पोहचविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्हयांसाठी ५१०० कोटी हुन अधिकचा निधी खर्च होणार आहे.