Home विदर्भ शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, उमरखेड तालुक्यातील घटना

शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, उमरखेड तालुक्यातील घटना

0
उमरखेड- शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्हात लपून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मरसुळ शिवारातील शेतात घडली. या घटनेने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
प्रकाश नागोराव सुरोशे वय ५५ रा. गारगव्हाण ता. हदगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव अाहे. त्यांनी मरसुळ शिवारातील किसन घोंगडे यांची शेती केली होती. प्रकाश सुरोशे हे गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता, गव्हात लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. 

Exit mobile version