
गोंदिया : अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्ली विदर्भ प्रांताची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सक्षम कार्यालय येथे राष्ट्रीय विचारधारा जपणार्या जिल्ह्यातील भिन्न भाषी साहित्यीकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत अध्यक्ष अॅड. लखनसिंह कटरे होते. सभेत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे उद्देश्य, कार्य एवं विविध साहित्यिक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, गोंदिया जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. कार्यकारिणीत अध्यक्षपदी गोवर्धन बिसेन यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी जयंत शुक्ला, संघटनमंत्री सुषमा यदुवंशी, कोषाध्यक्ष किशोर भगत आणि सदस्यापदी प्रल्हाद हरिणखेडे, मुरलीधर खोटेले, वाय. सी. चौधरी, सी. एच. बिसेन, वंदना कटरे, किर्ती अग्रवाल, चिरंजीव बिसेन यांची निवड करण्यात आली.