गोरेगाव-तालुक्यातील ग्राम पिपरटोला (निंबा) येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समिती च्या वतीने क्रांतिवीर शहिद बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती कार्यक्रम व आदिवासी संस्कृतीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम दि. १८/११ रोज शुक्रवार ला साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज बोपचे सभापती पंचायत समिती गोरेगाव, उपाध्यक्ष हनवंत वट्टी आदिवासी आघाडी अध्यक्ष व जि. प. सदस्य गोंदिया, दीपप्रज्वलक म्हणून डॉ. लक्ष्मण भगत जि. प. सदस्य स्थाई समिती सदस्य गोंदिया, ध्वजारोहक शंकर मडावी राष्ट्रीय आदिवासी संघटक गोंदिया, रमेश पंधरे पं.स सदस्य गोरेगाव, मुख्य मार्गदर्शक म्हणून लक्ष्मीकांत धानगाये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गोंदिया, जे. डी. जगणित अनु. जमाती अध्यक्ष गोंदिया तसेच विशेष उपस्थित म्हणून वर्षाताई पटले सरपंच निंबा, रामेश्वर महारवाडे पं.स सदस्य गोरेगाव, मनोज वालदे, बुधराम बिजेवार प्रसिद्धी प्रमुख भा.ज.पा. गोरेगाव, माधवराव शिवणकर पो. पाटील निंबा, कुसन घासले माजी समाज कल्याण सभापती गोंदिया, मनिष बिजेवार समतादूत बार्टी पुणे, पुरुषोत्तम कटरे उपसरपंच निंबा, नंदलाल उईके ग्रा.प सदस्य निंबा, पुष्पाताई पटले ग्रा.प. सदस्य निंबा, रहांगडाले वनरक्षक निंबा, दिलीप पंधरे वनरक्षक परसाडीटोला, हेमराज कोसरे, बाळकृष्ण पटले, काशिनाथ भेंडारकर, बंडू रहांगडाले, सुरेश बिसेन, रमेश पंधरे, तुलाराम जगणित, दिवाकर चौधरी, यशवंत जगणित, देवकरण कटरे, हरिभाऊ चौधरी, रतिराम कटरे, व गावकरी उपस्थित होते.
यावेळी मनोज बोपचे सभापती पंचायत समिती गोरेगाव यांनी क्रांतिवीर शहिद भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय असून देशाची स्वाधीनता आदिवासी समाजाची संस्कृती आणि गौरव सुरक्षित करण्यात त्यांचे कार्य अविस्मरणीय आहेत, यांनी आदिवासी समाजात देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा बिगुल वाजवला होता. इंग्रजांनी आदिवासींना बेदखल केले. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर अधिकार गाजविले. तेव्हा बिरसा यांनी आदिवासींना संघटित करून. अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला. बिरसा हे २०-२५ वर्षाचे होते पण त्यांनी संपूर्ण इंग्रज हुकूमशाही ला हालवून ठेवले. आजच्या युवा वर्गाने बिरसा मुंडा यांचे गुण आत्मसात करावे व “क्रांतिकारी चिंगारी का नाम है बिरसा
दमनकारियों का मुँह तोड़ जवाब है बिरसा
आदिवासियत का कवच है बिरसा
पुरे देश को अपने साहस से जगाने वाले वह भगवान है बिरसा
धरती आबा बिरसा मुंडा जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन” असे म्हणत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन नंदलाल उईके यांनी केले व आभार पुरुषोत्तम कटरे यांनी केले.