
गोंदिया दि. 23: सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बाल कामगार प्रथेविरुद्ध जागृती करण्यात आली.
बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती सप्ताह व बालहक्क सप्ताह या निमित्त जिल्हा परीषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गिरोला, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा कुडवा व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा लहीटोला येथिल शाळेत सचेतना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत बालकामगार प्रथेविरुध्द व बालमजुरीपासुन परावुत्त करण्याकरिता तसेच चाईल्ड लाईन हेल्पनंबर 1098 तसेच चाईल्डलाईन मार्फत राबवत असलेल्या उपाययोजनां व बालहक्काबाबत पवन रोकडे, सुविधाकार, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, गोंदिया डि.एच. पटले, जिल्हा समन्वयक, चाईल्ड लाईन गोंदिया यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील मुख्याधापक व सर्व शिक्षकवृंद व जिल्हा बालसंरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन येथिल कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम अप्पर कामगार आयुक्त नि. पा. पाटणकर, सहाय्यक कामगार आयुक्त उ.सु.लोया, चाईल्ड लाईन संचालक अशोक बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त गुणवंत पंधरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.