दहा हजार लाभार्थ्यांनी घेतला महाशिबिराचा लाभ

0
20

 गोंदिया दि. 24: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी व वकील संघ सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 रोजी खोडशीवणी तालुका सडक अर्जुनी येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर महाशिबिरामध्ये सुमारे 10 हजार लोकांनी भेट देऊन प्रत्यक्ष लाभ घेतला. महशिबिरात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील योजनांचे 38 स्टॉल लावून ग्रामस्थांना लाभ देण्यात आला.

 या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे  म्हणून  न्यायमूर्ती अविनाश जी घरोटे, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायाधीश गोंदिया जिल्हा व  न्यायमूर्ती  महेंद्र डब्ल्यू चांदवानी, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ नागपूर हे उपस्थित होते.

          या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद टी. वानखेडे, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सकलेश पिंपळे, तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष डॉ. विक्रम आव्हाड, तालुका वकील संघ सडक अर्जुनीचे अध्यक्ष ॲड. दिपक बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात न्यायमूर्ती यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि रोपट्याला जलअर्पण करून करण्यात आली. न्या. घरोटे यांनी आपल्या भाषणामध्ये जमलेल्यांना न्यायाची दरवाजे सामान्य जनतेसाठी सदैव खुले आहेत त्यासाठी  सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया याद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत कायद्याची जाणीव व सामान्य लोकांचे हक्क व अधिकार आहेत, यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाते असे प्रतिपादन केले.

          लोकांना या महाशिबिरामधे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील ज्या काही योजना आहेत त्या सामान्य लोकांसाठीच आहे व त्यांच्या लाभ सामान्य लोकांनी त्यांनी घ्यावा असे आवाहन न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी  यांनी केले.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खोडशिवनी गावातील महशिबिर आयोजन समिती, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. सदर महाशिबिरास गोंदिया जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम यांनी व आभार प्रदर्शन  न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांनी केले.