नवेगावबांध-स्वत: मधील न्यूनगंड दूर करून विद्यार्थ्यांनी कठोर पर्शिम करून स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून करणी करेगा तो नरका नारायण बनेगा या उक्तीप्रमाणे कठोर पर्शिम आत्मविश्वास व सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले.
ते गोंदिया पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर कॅम्प देवरी, उपविभागी पोलिस अधिकारी संकेत देवळेकर देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र धाबेपवनी येथे माधवराव पाटील डोंगरवार विद्यालयात स्पर्धा परीक्षा व स्वयंरोजगार मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला अशोक बनकर अपर पोलिस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांच्यासह नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पांढरे, धाबेपवनी सशस्त्र दुरुक्षेत्र केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रेशीम कापगते, वसंत गुढेवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, सशस्त्र दूरचित्र धाबेपवनीचे सर्व पोलिस अंमलदार, विद्यालयाचे विद्यार्थी, सर्व शिक्षक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.
पवनीधाबे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे अपर पोलिस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१ नोव्हेंबरला सशस्त्र दूरक्षेत्र पवनीधाबे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात आस क्लिनिक नवेगावबांधचे डॉ. शुभांगी लांडगे व त्यांची चमू, दंतचिकित्सक डॉ.श्याम भोयर यांनी शिबिरात सेवा दिली. शिबिरात बीपी, शुगर, मोफत तपासणी व मार्गदर्शन, गरोदर मातांची तपासणी, लहान मुलांची तपासणी व दंतचिकित्सा करण्यात आली.
गावातील ग्रामस्थ,माधव पाटील डोंगरवार विद्यालय, स्वामी विवेकानंद आदिवासी आर्शम शाळा, येथील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारीवृंद महिला, पुरुष, बालके विद्यार्थी शिक्षक अशा ३00 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अपर पोलिस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर देवरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले. कार्यक्रमाला नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे, सशस्त्र दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे,भारतीय राष्ट्रीय बल क्रमांक १५ चे पोलिस उपनिरीक्षक रमेश नरोटे, मुख्याध्यापक रेशीम कापगते, मुख्याध्यापक दिहारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय बल गट क्रमांक १५ कॅम्प गोंदिया, बिरसी कॅम्प, सशस्त्र दूरक्षेत्र पवनी धाबे पोलिस ठाणे नवेगावबांध चे पोलिस अंमलदार, दोन्ही विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच धावेपवनी येथील ग्रामस्थ महिला, पुरुष, लहान बालके या शिबिराला बहुसंख्येने उपस्थित होते.