Home विदर्भ ह्दयविकाराच्या धक्क्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू

ह्दयविकाराच्या धक्क्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू

0

देवरी,दि.७ : येथील गटसाधन केंद्रात बंदोबस्तावर असताना ह्दयविकाराचा धक्का बसल्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. बाबूराव अंबर शेंडे (वय ५४, रा. देवरी) असे मृताचे नाव आहे.
बाबूराव शेंडे हे येथील पोलिस उपमुख्यालयात कार्यरत होते. सोमवारी सकाळी गटसाधन केंद्रात ते बंदोबस्तावर असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांना त्वरित पोलिस वाहनाने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेंडे हे मूळचे आमगाव तालुक्यातील पोवारीटोला येथील रहिवासी आहेत.

Exit mobile version