
देवरी,दि.24ः लोकसेवकाने नागरिक तथा कार्यालयाील सेवकांना सौजन्यपुर्वक वागणुक देणे अपेक्षित आहे. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिक्षक (Medical Superintendent) हे त्यांच्या कर्मचार्यांशी गैरवर्तणुक करीत असल्यामुळे कर्मचार्यांमध्ये त्यांच्याप्रति तिव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी आपल्या वागणुकीत सुधारणा न केल्यास कर्मचार्यांनी आंदोलंनाचा इशारा दिला आहे. देवरी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent) आणि कर्मचार्यांमधे वाद वाढत चालला आहे.आरोग्य कर्मचारी, परिचारिकांशी वैद्यकीय अधिक्षक सभ्यतेने वागत नाही, शिविगाळ करतात. कर्तव्र्य व अधिकाराचा गैरवापर करून रुग्णालयात नियमित कर्मचारी असून ही त्यांना शल्यचिकित्सा कक्षात प्रवेश न देता बाहेरिल अप्रशिक्षित व्यक्तींना रोजंदारीवर घेऊन त्यांच्याकडून काम
करित असल्याचा आरोपही कर्मचार्यांनी केला आहे.
वैद्यकीय अधिक्षक परिसेविका, परिचारिका व इतर कर्मचार्यांचे वेतन विणाकारण कपात करित असल्याचेही कर्मचार्यांचे म्हणने आहे.कर्मचारी, परिसेविका व परिचारिका यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही.25 डिसेंबर पर्यंत वैद्यकीय अधिक्षक डॉ. आनंद गजभिये यांच्यावर कारवाई न झाल्यास 26 डिसेंबर पासून उपोषण करण्याचा ईशारा इशारा कर्मचार्यांनी निवेदनातुन दिला आहे. निवेदनाच्या प्रति आमदार सहेषराम कोरोटे, जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविल्या आहेत.
कर्मचार्यांनी केलेले आरोप निरर्थक – डॉ. गजभिये
आपण कुणाशिही असभ्यतेने वागलो नाही. कामाकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांवर वरिष्ठ अधिकार्यांनी रागावणे सहज बाब आहे. रितसर कामाविषयी बोलतो, कर्मचार्यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत.