
सडक अर्जुनी-,गावांचा विकास झाला तरच देशाचा सुध्दा सर्वांगिण विकास होवू शकतो. त्यामुळे नवनियुक्त सरपंचानी गावाचा विकास आराखडा तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सरपंचांनी गावाच्या सर्वांगिण विकासाचा ध्येय उराशी बाळगून कार्य करावे असे आवाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.ते स्थानिक तेजस्विनी लॉनमध्ये तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून राकाँ जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकार, जिप उपाध्यक्ष यशवंत
गणवीर, जिप सदस्या सुधा रहांगडाले, जिल्हा बँकेचे संचालक गजानन परशुरामकर,नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, पंस सभापती कामिनी कोवे, पंस सदस्य डॉ. रुकीराम वाढई, शिवाजी, माजी जिप सदस्य रमेश चुर्हे, शशिकला टेंभुर्ने, आनंद अग्रवाल, दीक्षा भगत,शाहिस्ता शेखशे आदी उपस्थित होते.या वेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.