
गोंदिया/भंडारा- महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्यातील सुमारे १0 हजार आरोग्य अधिकार्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारले होते.गोंदिया/ भंडारा जिल्ह्यातही आरोग्य अधिकार्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेला देशात तिसर्या क्र मांकावर आणण्यामध्ये या सर्व समुदाय आरोग्य अधिकार्यांचे मोलाचे योगदान आहे. परंतु, प्रमाणिकपणे सेवा प्रदान करीत असताना समुदाय आरोग्य अधिकार्यांना भेडसावणार्या समस्या व आर्थिक नुकसान त्यांचे मनोबल खच्चीकरण करीत आहे. समुदाय आरोग्य अधिकार्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्यातील १0 हजार समुदाय आरोग्य अधिकार्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन पुकारले.
समुदाय आरोग्य अधिकार्यांना सेवेत कायम करुन गट ब अधिकार्यांचा दर्जा देण्यात यावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ४0 हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस देण्यात यावा. निश्चित वेतन व कामावर आधारीत वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन ३६ हजार रुपये व कामावर आधारित वेतन ४ हजार रुपये करण्यात यावे. समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या बदलीसंदर्भात धोरण निश्चित करण्यात यावे. २३ इंडिकेटरचे कामावर आधारीत मोबदला रद्द करण्यात यावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बढती देण्यात यावी. हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणार्या क्षेत्राच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावा. टिए-डीए देण्यात यावा. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या सर्व मागण्यांना घेऊन आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्यांनी सर्व प्रकारचे ऑनलाईन पोर्टलचे काम बंद करुन कामबंद आंदोलन पुकारले. मागण्यांवर विचार न झाल्यास २३ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत कामबंदचा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा यांना पाठविले. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील १५0 आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.तर गोंदिया जिल्ह्यात डॉ. आशीष रहांगडाले, डॉ. चन्दन रंगारी, डॉ.मयुर टेंभुर्णे, डॉ.जुनेद सैयद, डॉ.सूशिल अबुले, , डॉ.योगेन्द्र भगत, डॉ.शशांक, डॉ.चन्द्रास, डॉ. सारिता ठाकुर , डॉ. इन्दिरा, डॉ.सोनालि गौतम, डॉ उमाकांत पटले, डॉ प्रवीण उजवने, डॉ. परमानंद कठाने, डॉ.स्नेहा पटले, डॉ.पूजा थाकुर, डॉ.श्रुति सावालखे, डॉ.प्राचि , डॉ. प्रियका भगत, डॉ साखरे, डॉ रोहित, डॉ निशांत, डॉ. विलास , डॉ गुरबेले, डॉ.महेन्द्र, डॉ. सितेश , डॉ. नाजिया, डॉ. योगेश हिरापुरे, डॉ. गोकुल बिसेन, डॉ. प्रशांत यांच्यासह जिल्ह्यातील डाॅक्टरांनी सहभाग नोंदवला.