Home विदर्भ कोंढा येथे नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सत्कार

कोंढा येथे नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सत्कार

0

पवनी-ग्रामपंचायत विकासाची पहिली पायरी आहे. जनतेने गावाच्या विकासासाठी आपल्याला निवडून दिलेले आहे याचे ध्यान ठेऊनच विकासाकरिता कोणतेही राजकारण आड येऊ न देता तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यानी ग्रामविकासाची जबाबदारी घ्यावी विकासाकरीता आम्ही तुमच्या सोबतीला आहोतच आपण ग्राम विकासाची कास धरू असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

पवनी तालुक्यातील अक्षय सभागृह,ग्राम कोंढा येथे पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच व सदस्यांचा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल बोलत होते.

खासदार पटेल पुढे म्हणाले कि, सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार आम्ही नेहमी करतो, आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्यात आला. आता विद्यमान सरकारने दिलेला बोनस तुटपुंजा आहे. मागील वर्षीचा 2021- 22 मधील 600 करोड शेतकऱ्यांचा धानाला बोनस ची मंजूर राशी पण ह्या सरकारने दिलेली नाही. मात्र सत्ता असो किव्हा नसो मी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी सुविधेकरिता आम्ही सरकार मध्ये असतांना गोसे खुर्द प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा याकरिता राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले होते. मात्र आताच्या सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

खासदार प्रफुल पटेल जी यांच्या सोबत सर्वश्री पंढरीनाथ सावरबांधे, हिरालाल खोब्रागडे, शैलेश मयूर, अविनाश ब्राह्मणकर, लोमेश वैद्य, विजय सावरबांधे, तोमेश्वर पंचभाई, सुनंदा मुंडले, चेतक डोंगरे, छोटूभाऊ बालबुद्धे, मनोरथा जांभुळे, सुनंदा डडमल, गुड्डू रघुते, सुरेश सावरबांधे, किशोर पालांदूरकर, मनोज कोवासे, जयशीला भुरे, मॅनेज संतलवार, नंदू कुर्झेकर, सोमेश्वर भुरे, गोलू अलोणे, राहुल काटेखाये, राजकुमार वाडीभस्मे, आशिष वयरे, वृंदा वाडीभस्मे, शालू सय्यम, युवराज लढाईकर, सुरेश शहारे, जयदेव ढोमणे, विजू वाडीभस्मे, नारायण काटेखाये, ममता गिरडकर, दुर्गा डाखोरे, रजनी मेश्राम, मनोरथा वैद्य, कोमल दोनोडे, सोमेश्वरभोयर, गंगाधर हत्तीमारे, माणिक दुबे, नाडा आगरे, आशा हत्तीमारे, पायल ठवकर, संगीत भोयर,अनिल देशमुख, देवेंद्र देशमुख, कविता ब्राह्मणकर, विष्णू कुर्झेकर, अरुण मोटघरे, संदीप तुळणकर, भावनाताई शेंडे, पौर्णिमा कावळे, अनिता दहिवले, अनुप मेश्राम, पुस्पमाला कोहळे, वसुश्री टेम्भूर्णे, ज्योती कुंभलकर, कुंदा नान्हे, देवांगना गजभिये, अजित खोब्रागडे, प्रणिता पाहुलझगडे, करूना खोब्रागडे, करुणा दुपारे, करुणा बु. खोब्रागडे, पायल गोसावी, वर्षा लाखे, सोनू मेश्राम, दीपक भोयर, लेकराम फुंडे, संतोष सावरबांधे, दीपक हुमणे, मंदा लोखंडे, वैशाली येळणे, रेखा मोहरकर, रुपेश जिभकाटे, शारदा भानारकर, शालिक जिभकाटे, संगीत पंचभाई, रामकृष्णा शेंडे, लोपामुद्रा वैरागडे, विक्की भोयर, शोभिवंत गेडेकर, राष्ट्रपाल भोयर, सुवर्णा चंदनबावने, आशिष जुवार, रामचंद्र गिऱ्हेपुंजे, शिशुपाल रामटेके, संजय ठवरे, मंगेश भोयर, रोशन माथुरकर, प्राची कोरे, उषा माथुरकर, ताराबाई धारगावे, संजय चोपकर, पुरुषोत्तम सेलोकर, चंद्रगुप्त मेंढे, योगिता पंचभाई,नागेश जनबंधू, रुपाली गभणे, विभा पचारे, हेमंत मेनवाडे, शालिक मेश्राम, अजय बनसोड, वलगु नागपूरकर, पौर्णिमा पचारे, चंद्रहास पचारे, लता बावनकर, गायत्री जुमळे, नीता देशमुख, संदीप बावनकर पुष्पा वंजारी, द्रोणाचार्य बावनकर, मंगेश कोशेकर, युवराज सावरबांधे, सायत्रा सिंधीमेश्राम, माधवी इखार, दामिनी मेश्राम, उज्वला मेश्राम, उर्मिला धारगावे, वसंत चुटे, मीना निखाडे, शोभाताई नखाते, वनिता शिवणकर, प्रमोद डोये, हेमराज डोकरे, सुरेश मेश्राम, यमु सपाटे, प्रमिला हत्तीमारे, फिरोज मोहरकर, सालीत रासेकर, देवकी भुरे, स्वाती बनकर, स्वाती भुरे, चरणभाऊ पालवार, वर्षाताई वंजारी, किशोर मोहरकर, वाल्मिक मथुरकर, महेश गजभिये, अनिश्चय मेंढे, शीतल रामटेके, रेखा हत्तीमारे, अनिता मांडवकर, सुनील भाजीपाले सहित नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Exit mobile version