Home विदर्भ जैन कलार समाजाचे स्नेह संमेलन व लोकार्पण सोहळा संपन्न

जैन कलार समाजाचे स्नेह संमेलन व लोकार्पण सोहळा संपन्न

0

गोंदिया- जैन कलार समाज जिल्हा गोंदियाच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन, गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व सभामंडपाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन २९ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
स्थानिक जैन कलार समाज सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.विनोद अग्रवाल होते. कार्यक्रमाचे उद््घाटन माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूरचे माजी अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्यरत अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, सचिव कार्तिक शेंडे, उपाध्यक्ष शशीकांत सर्मथ, संचालक शैलेश दहिकर, स्वप्नील सर्मथ, विनोद खानोरकर, विनोद खेडीकर, सुखराम खोब्रागडे, विनोद भांडारकर, शैलेजा सोनवाने, वनिता भांडारकर, नागपूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिवणकर, दानदाता शालिकराम लिचडे, भैय्यालाल मोरघडे, हरीराम भांडारकर, महेंद्र सोनवाने, काशिनाथ सोनवाने, दिगंबर लिचडे, तेजराम मोरघडे, शोभेलाल दहीकर, सुखलाल हरडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात माता जैनादेवी व समाजाचे आराध्यक्ष भगवान सहस्त्रबाहू यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यानेतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून जैन कलार समाजाचे अध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य अशी आर्थिक मदत मिळविण्याकरीता जनप्रतिनिधी व मध्यवर्ती मंडळाच्या मान्यवरांनी विनंती केली. यानंतर समाजातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी माध्यमाच्या निबंध स्पर्धेत प्रथम स्नेहा खोब्रागडे, व्दितीय नेहा खोब्रागडे, तृतीय रिया किरणापुरे तर मराठी माध्यमातून श्‍वेता पालांदूरकर प्रथम, ेजेश्‍वरी मुरकूटे व्दितीय तर सलोनी तिडके हिने तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ.परिणय फुके व आ.विनोद अग्रवाल यांच्या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच भवनाच्या सौंदर्यीकरणासाठी २0 लक्ष रुपए देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन उमेश भांडारकर तर आभार प्रदर्शन यशोधरा सोनवाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विणा सोनवाने, धनपाल कावळे, संजय मुरकूटे, वरूण खंगार, नामदेव सोनवाने, मनोज किरणापुरे, विजय ठवरे, चंद्रशेखर लिचडे, वशिष्ठ खोब्रागडे यांच्यास समाज बांधवानी पर्शिम घेतले.

Exit mobile version