Home विदर्भ रमाई आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे साजरा

रमाई आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे साजरा

0

गडचिरोली: रमाई जयंतीचे औचित्य साधून समस्त सक्षमीकरण बहुउद्देशिय विकास संस्था यांच्या वतीने नवेगांव येथे असलेल्या संस्थेच्या उपकार्यालयात दि. 07 फेब्रुवारी रोजी विविध समाजातील महिलांनी एकत्रित येवून माता रमाई जयंती साजरी केली. यावेळी माता रमाई, माता जीजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या आदर्श मार्गावर चालून स्त्रीया स्वतःसोबतच स्वातःच्या मुलांची, परिवाराची, समाजाची व देशाची प्रगती कशा प्रकारे घडवून आणू शकतात याबाबत उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनातून विचार व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी पराक्रमी मातांच्या आठवणींना जयंती निमित्ताने कार्यक्रम घेवून त्यांनी केलेले सामाजिक कल्यानाच्या कार्याचा वसा समोर घेवून जाण्याचा संकल्प कार्यक्रमास उपस्थिती महिलांनी केला. शिक्षण हेच मनुष्याला प्रगतीच्या वाटवर नेण्याचा मुख्य मार्ग आहे मनुष्य जीवन सुखी करण्याचे हेच एकमेव साधन असून समाजाला योग्य दिशा दाखविणारी पुस्तक मनुष्याला प्रज्ञावान व नितीवान मुल्य जपण्याची प्रेरणा देते म्हणून दि. 06 फेब्रुवारी पासून ते येवू घातलेल्या महिला जागतीक दिनापर्यंत सामाजिक न्यायाच्या हिताचे साखळी पुस्तक वाचन कार्यक्रम या अभिनव उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा भावना प्र. लाकडे तसेच प्रियाताई चिमुरकर, शितल आव्हाड, निराला मिलन व पाटील ताई यांनी आम्ही या तिन्ही मातांचे आजन्म ऋणी राहू असे विचार व्यक्त केले व भारत देशाची या गौरवशाली मातांच्या जयंत्या साज-या करून समाजाला जागृत ठेवणे हेच समाज हिताचे आहे असे मुल्यवान विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन प्रविना लाडवे तर श्रेयश सयाम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version