छत्रपतींच्या कृति अंगीकृत करा- पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे

0
20

गोंदिया,दि.20ः- छत्रपतींचा इतिहास न विसरणारा आहे.शिवचरित्राचे वाचन करा.ती आजच्या जिवनात काळाची गरज आहे.छत्रपतींचे नुसते फोटो लावुन व जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांची कृति प्रत्यक्षात जिवना मध्ये आणून आदर्श अंगीकृत करा,असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले.ते स्थानिक मनोहर चौक येथे श्री शिव छत्रपती मराठा समाजाव्दारे 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिव जयंती समारोहात बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण व निखिल पिंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे होते.पाहुणे म्हणून नगर परिषदचे मुख्याधिकारी करण
चव्हाण,कार्यकारी अभियंता अनंत जगताप,वसंतराव बढे,अँड.राजा बढे,शहर पोलिस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी,दामोदर अग्रवाल,व्दारका सावंत,माधुरी नासरे,भावना कदम,माया सणस,राजु तुपकर आदींची उपस्थिती होती.प्रसंगी छत्रपती शिवाजींचा पुतळा दान करणारे दिपक, नारायण,शिला या सावंत कुटुंबीयांचा तसेच नगर परिषद अभियंता अनिल दाते,
आर्किटेक्ट विवेक भालेराव,शशीकांत चवरे,शुटींग गोल्ड मेडलीस्ट आदित्य जगताप,दिव्यांग धर्म काळे यांचा शाल व श्रीफल देवुन सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी यांनी शिवाजी महाराजांचा जिवन चरित्रावर प्रकाश टाकून मनोहर चौक येथे प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा काही त्रुटीं साठी थांबली असुन त्रुटींची पुर्तता लवकरच केली जाणार असल्याचे म्हणाले.