साकोली-अर्जुनी/मोरगांव मार्गे जाण्या-येण्याऱ्या सर्व बसेस खांबी वरून जाऊ द्या

0
288

अर्जुनी मोरगांव,दि.०७-.तालुक्यातील बोंडगांव/देवी ते खांबी या रस्त्याला मोठ,मोठे खड्डे पडून मागील दोन-तीन वर्षापासून दयनीय अवस्था झाली होती.पण संबधित अधिकारी व प्रशासनाला जाग आल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजूरी देऊन काम मागील महिन्यात पूर्ण झाले आहे.तालुक्यातील खांबी हे गाव महत्त्वाचे गाव असून या गावामध्ये बसस्थानक असून गावावरून काही मार्गावर बस धावतात; पण काही बस धावतच नाही. यामुळे शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थीना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि इतर प्रवाश्यांना शुद्धा या समस्येला दररोज तोंड द्यावे लागते आहे.एसटी महामंडळ साकोली व भंडारा आगाराच्या बोंडगांव देवी वरून अर्जुनी मोरगांव मार्गे जाणाऱ्या बसेस आहेत.त्या सर्व बसेस बोंडगांवदेवी ते खांबी या मार्गाने न जाऊ देता एसटी वाहनचालक आपल्या मनमर्जीने सरळ बोंडगांव/देवी ते निमगांव, अर्जुनी मोरगांव मार्गे नेतात असे प्रवाश्यांचे म्हणने आहे.त्यामुळे खांबी येथे बसस्थानक असूनही एक ते दोन तास मोठ्या आतुरतेने बसची वाट पाहत प्रवाशांना ऊन किंवा पाऊस असो खांबी या बस स्थानकावरून पायपीट करून बोंडगांव/देवी किंवा निमगांव याठिकाणच्या बसस्थानकावर जाण्याची वेळ आली आहे. महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी, आणि वृद्ध महिला व पुरुष तसेच इतर प्रवाशांना जाऊन मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. तरी सुद्धा संबंधित अधिकारी व प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष न करता महाविद्यालयीन, शाळकरी या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार नाही एवढा भान ठेवून एसटी महामंडळ साकोली व भंडारा आगाराच्या अर्जुनी मोरगांव मार्गे जाणाऱ्या-येणाऱ्या या सर्व बसेस बोंडगांव/देवी ते खांबी या मार्गाने जाऊ देण्यात यावे अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांनी व प्रवासी प्रामुख्याने ग्रामपंचायत खांबी यांनी केली आहे.