Home विदर्भ डॉ. मंगला कटरे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

डॉ. मंगला कटरे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

0

गोंदिया-जिल्ह्यातील एक मात्र असलेल्या राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला कटरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोंदिया येथे आयोजित भव्य कृषी महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०१५ ते वर्ष २०२० या पाच वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा एकाच वेळी करण्यात आली आहे. महिला व बालविकासाच्या क्षेत्रात चांगले काम करणार्‍या महिलांना व संस्थांना शासनाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.पुरस्कार मिळाल्यानंतर घरी वडीलांना समाज कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी समाज कार्याचे शिक्षण घेण्यासाठी मला व माझ्या मोठया बहिनीला खुप प्रेरीत केले. माझ्या मोठ्या बहिनीने समाजकार्याचे शिक्षण पूर्ण करुन ती हायकोर्टात कौटुंबीक सल्ला व मार्गदर्शन केंद्रात कार्य करित आहे आणि मी स्वतः समाजकार्य करुन १९९७ पासून राजीव गांधी समाज कार्य महाविद्यालय गोंदिया येथे प्राध्यपकाचे कार्य करित आहे. तसेच समाजातील गरजू महिलांना समुपदेशन करण्याचे देखील कार्य करत असल्याचे राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला कटरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त म्हटले आहे.

Exit mobile version