Home विदर्भ आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय “उत्कृष्ट आशा” पुरस्कार सोहळा संपन्न

आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय “उत्कृष्ट आशा” पुरस्कार सोहळा संपन्न

0

गोंदिया- आरोग्य विभागामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय “उत्कृष्ट आशा” पुरस्कार वितरण 2020- 21 वर्षासाठीचे स्व.यशवंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम, समाज कल्याण सभापती पूजाताई सेठ ,जिल्हा परिषद सदस्य सुधाताई रहांगडाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, महिला व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.
आशा ही गावपातळी वरची महत्वाची दुवा असुन आरोग्य विषयक सर्व बाबींची माहिती तिने जवळ
ठेवुन गुणात्मक आरोग्य सेवा देणे महत्वाचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी याप्रसंगी म्ह्टले आहे. जिल्ह्यातील आशा सेविका यांनी कोरोना काळात गावोगावी उक्तृष्ट कामकाज केल्याने सर्व आशांचे कौतुक व अभिनंदनास पात्र असल्याचे  अध्यक्ष पंकजजी रहांगडाले यांनी या कार्यक्रम प्रसंगी म्ह्टले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आंशा स्वयंसेविकामार्फत आरोग्य विषयक जनजागृती, माता व बाल आरोग्य दर्जा उंचावण्यासाठी व विविध योजनांची माहिती जनतेला होणेकरिता आंशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात आले आहेत.जिल्ह्यात ग्रामिण भागात 1159 व शहरी भागासाठी 58 आशा सेविका कार्यरत असल्याची माहिति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
आंशा स्वयंसेविका यांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याचे प्रेरणा देण्याकरिता उत्कृष्ट कार्य करणारे आंशा स्वयंसेविकांना “उत्कृष्ट आशा” पुरस्कार  जिल्हा स्तरावरून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
2020-21 वर्षात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे सर्व निर्देशकांची गुणांकन पद्धतीनुसार , एकही माता व बालमृत्यू झालेल्या नाही असे कार्यक्षेत्र आलेली आशा, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कामकाज , ग्राम आरोग्य पोषण दिन कामकाज ,कुटुंब नियोजन कार्यक्रम, पात्र जोडप्यांना दोन मुलांमध्ये अधिक अंतर, कुटुंब नियोजन साधन वाटप, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे, वार्षिक मोबदला,नियमित गृहभेटी, आरोग्य संस्थेची देखभाल व स्वच्छता , राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची गुणवत्ता , सर्व रेकॉर्ड दस्तावेज अद्यावत ठेवणे ई. विविध बाबींच्या आधारे गुणांक पद्धतीने पुस्कारासाठी निवड करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांनी दिली आहे.
या जिल्हास्तरिय कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्लाचे ममता अनिल गोखले यांना प्रथम पुरस्कार , सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथील पुस्तकाला सहेसराम पटले यांना द्वितीय पुरस्कार तर ह्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिवणटोला गावातिल अमृता भिवराज पटले यांना तृतीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. 2021-22 वर्षात ममता अनिल गोखले यांनी आंशा स्वयंसेविका योजने अंतर्गत 2520 लोकांना आरोग्य सेवा देवुन रु. 1,83,254/- एवढे वार्षिक मानधन प्राप्त केले. पुस्तकाला सहेसराम पटले यांनी आंशा स्वयंसेविका योजने अंतर्गत 2637 लोकांना आरोग्य सेवा देवुन रु. 1,81,959/- एवढे वार्षिक मानधन प्राप्त केले. अमृता भिवराज पटले यांनी आंशा स्वयंसेविका योजने अंतर्गत 2423 लोकांना आरोग्य सेवा देवुन रु. 1,76,741/- एवढे वार्षिक मानधन प्राप्त केले. त्यांच्या ह्या विशिष्ट गुणवत्तापुर्वक उत्कृष्ट कामामुळे जिल्हास्तरिय पुरस्कार देण्यात आला आहे.
सर्व पुरस्कार प्राप्त आंशा स्वयंसेविका  यांचे आरोग्य क्षेत्रात अभिनंदन केले जात आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली खोब्रागडे तर आभार प्रर्दशन विनोद चौधरी यांनी केले. जिल्हास्तरिय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, अधिपारिचारिका कल्याणी चौधरी व आरोग्य विस्तार अधिकारी अनिता तिरपुडे, आशा योजनेचे समन्वयक संजय दोनोडे व भुनेश्वरी देशमुख यांनी मोलाची कामगिरी केली.

Exit mobile version