जिल्ह्यात “हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना “चे आज होणार लोकार्पण

0
59

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा 8 ठिकाणी होणार लोकार्पण
गोंदिया-शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण ,आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.
महाराष्ट्र राज्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत.
शहरी भागातील एकूण लोकसंख्येपैकी साधारणता 12,000 ते 20,000 लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  स्थापन केले जातील. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  केंद्रासाठी विशेष ब्रॅण्डिंग व लोगो (मुंबई येथील हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  प्रमाणे) विकसित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यातील याप्रमाणे एकूण 342 पैकी 317 कार्यान्वित झालेल्या ठिकाणी 1 मे 2023 पासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाची लोकोपयोगीता लक्षात घेऊन सदर केंद्राच्या संकेत वाढ करून त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील.
हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  मध्ये खालील प्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.
1) बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 2.00 ते रात्री 10.00)
2) मोफत औषधोपचार
3) मोफत तपासणी
4) टेली कन्सल्टेशन
5) गर्भवती मातांची तपासणी
6) लसीकरण
तसेच या केंद्रामध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करून दिल्या जातील
1)  महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी
2) बाह्य यंत्रणेद्वारे ( एच.एल-एल.कंपनी मार्फत) रक्त तपासणीची सोय
3) मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
4) आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा
हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून बाह्यहेरुग्ण विभागातील खालील विशेषतज्ञ संदर्भ सेवा विशेष विशेषतज्ञांमार्फत प्रदान करण्यात येतील.
1) भिषक (फिजिशियन)
2) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
3) बालरोग तज्ञ
4) नेत्ररोगतज्ञ
5) त्वचारोग तज्ञ
6) मानसोपचार तज्ञ
7) नाक कान घसा तज्ञ
सदर तज्ञ सेवा या सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. जेणेकरून झोपडपट्टी भागातील मजूर कामावरून परत आल्यानंतर या सेवाचा लाभ घेतील आव.श्यकतेनुसार अतिरिक्त सेवा सदर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  मध्ये वाढवण्यात येतील.
हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना केंद्रामध्ये पुढील प्रमाणे मनुष्यबळाचा समावेश असणार आहे.
1) वैद्यकीय अधिकारी
2) स्टाफ नर्स
3) बहुउद्देशीय कर्मचारी
4) अटेंडंट/ गार्ड आणि
5) सफाई कर्मचारी
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना  (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) च्या डिजिटल अनावरण सोहळ्या बाबत दि.1 मे रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे.
हा डिजिटल अनावरण सोहळा एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व प्रा. डॉ. तानाजी सावंत, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
जिल्ह्यातील हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठिकाणे –
1) गोंदिया शहर – “आपला दवाखाना” छोटा गोंदिया, गोंदिया
2) तिरोडा शहर – “आपला दवाखाना” भिमनगर , तिरोडा.
3) गोरेगाव – “आपला दवाखाना” मेन रोड ,गोकुळ हॉटेल जवळ, गोरेगाव.
4) आमगाव – “आपला दवाखाना” कामगार चौक, वॉर्ड क्र.2, लांजी रोड, आमगाव.
5) देवरी – “आपला दवाखाना” चिचगड रोड, देवरी.
6) सालेकसा- “आपला दवाखाना” फॉरेस्ट ऑफिस जवळ,सालेकसा.
7) सडक अर्जुनी- “आपला दवाखाना” कठाणे हाऊस, प्लॉट न.2, सडक अर्जुनी.
8) अर्जुनी मोरगाव – “आपला दवाखाना” मोरगाव वॉर्ड क्र.5, हनुमान मंदिराजवळ, अर्जुनी  मोरगाव.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरू होणाऱ्या “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात” देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केले आहे.