
गोंदिया-प्रजासत्काक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी पार्क, दादर (मुंबई) येथे आयोजित संचलनामध्ये २१ पथकांनी सहभाग घेतला होता. यात सर्वोत्कृष्ट संचलन केल्यामुळे गोंदिया-गडचिरोली सी-६0 पथकाने प्रथम क्रमांक प्रप्त केला. दरम्यान २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी पार्क, दादर (मुंबई) येथे आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमामध्ये अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार, यांचे हस्ते गोंदिया-गडचिरोली सी-६0 पथकाचे नेतृत्व करणारे पथक प्रमुख देवीदास कठाळे, पोलीस निरीक्षक, गोंदिया यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचालनाक गोंदिया-गडचिरोली सी-६0 पथकाने उत्कृष्ट संचालन करीत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अशोक बनकर यांनी संचलनामध्ये सहभागी असणारे गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, पोलीस उपनिरिक्षक खेडकर, ढाकणे आणि गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उप निरीक्षक सतिश पाटील, बोडरे यांचे तसेच संचलनामध्ये सहभागी झालेल्या सी-६0 पथकातील सर्व कमांडोंचे अभिनंदन करून कौतुक केले आहे व सी-६0 पथक कायम सर्वोत्कृष्ट राहण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.