सडक अर्जुनी,दि.02- तालुक्यातील रमेश सहदेव लांजेवार यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल सडक अर्जुनी तहसिल कार्यालयाच्यावतीने सामाजिक पुरस्काराकरीता निवड केल्याने त्यांचा 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवविण्यात आले.यावेळी पोलीस अधिक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीसह इतर अधिकारी उपस्थित होते.
रमेश लांजेवार हे सामाजिक क्षेत्रामध्ये जवळपास सात ते आठ वर्षापासून आजपर्यंत जिल्ह्यातील तालुक्यातील व गावागावात जाऊन विविध शासनाची माहिती पोहोचवणे, कॅम्पिंग घेणे,स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे, क्रीडा स्पर्धा राबविणे व स्वच्छतेची जनजागृती करणे अशा अनेक प्रश्नांवर गाव पातळी पासून ते जिल्हास्तरापर्यंत अनेक कार्य करीत आहेत.सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला असा विविध प्रकारच्या पुरस्कार मिळाल्याने आपल्या यशाचे श्रेय मित्र-मैत्रिणींना मंडळींना तसेच गुरुवर्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला दिले आहे.