गोरेगाव,दिनांक ०२ मे-गोरेगाव पंचायत समिती सभागृह येथे गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष सोमेश्वर रांहागडाले यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटना गठीत करण्यात आली.अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, उपाध्यक्ष विजय बिसेन सरपंच हिरापुर, सचिव अरूण बिसेन सरपंच झाजिया, महिला सरपंच प्रमुख ग्रांम पंचायत निंबा सरपंच वर्षाताई पटले,महासचिव तुलसीताई टेंभरे सरपंच कटंगी,संघटन प्रमुख डॉ गणेश बघेले सरपंच सिलेगांव, यशवंत कावडे उपसरपंच खाडीपार, कोषाध्यक्ष अतुल मोटघरे सरपंच भंडगा,प्रचार प्रमुख के टी कटरे सरपंच गोंदेखारी,भरत घासले उपसरपंच पिंडकेपार, सदस्य भुमेश्वरीबाई रांहागडाले सरपंच चिचगांव, मोनिका डाहांरे सरपंच पालेवाडा,धु्र्पताबाई कटरे सरपंच बोंडुदा,हिरकणबाई तिरेले सरपंच पाथरी,वंशिलाताई उईके सरपंच बबंई,अनिल मडावी सरपंच कुर्हाडी,सोनाली साखरे सरपंच कालीमाटी,चंन्द्रशेखर बोपचे उपसरपंच म्हसगांव, रविंद्र बहेकार उपसरपंच तेंलनखेडी,अनुराग सरोजकर उपसरपंच गणखैरा, रमेश ठाकुर उपसरपंच बोरगांव,झनकलाल चौव्हाण उपसरपंच सोनी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.तर मार्गदर्शक म्हणून सोमेश्वर रांहागडाले माजी सरपंच बबंई,तेंजेन्द्र हरिणखेडे माजी सरपंच कटंगी,अल्काताई पारधी माजी सरपंच कुर्हाडी यांची निवड करण्यात आली.यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.