समाज कल्याण विभागाच्या यशोगाथा पुस्तिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

0
13

गोंदिया,दि.4 : समाज कल्याण विभागामार्फत लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. उत्कृष्टपणे राबविण्यात आलेल्या योजनांच्या यशोगाथांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात तयार करण्यात आलेली असून ‘‘यशोगाथा : सामाजिक न्यायाची, संकल्पपूर्ती नाविण्याची’’ या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले.

        याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, भारतीय राखिव बटालियनचे समादेशक अमोल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य राजेश पांडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतूरे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण, समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे, विद्या मोहोड, संगणक ऑपरेटर लक्ष्मण खेडकर व अमेय नाईक उपस्थित होते.