Home विदर्भ तिरोडा बाजार समितीचे माजी सभापती रहागंडाले यांची विषप्राशन करुन आत्महत्या

तिरोडा बाजार समितीचे माजी सभापती रहागंडाले यांची विषप्राशन करुन आत्महत्या

0

तिरोडा,दि.05-तिरोडा बाजार समितीचे माजी सभापती खैरबोडी निवासी डाॅ.चिंतामण रहागंडाले यांनी विष प्राशन करुन ऱाईस मिलच्या गोदामात आत्ममहत्या केल्याची घटना  आज 5 मे रोजी उघडकीस आली.

चिंतामण रहांगडाले हे गुरुवारला दिवसभर आपल्या काही मित्रासोबंत तिरोड्यात होते.त्यानंतर रात्री घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील त्यांचा थांगपत्ता लागला नाही . त्यामुळे कुटूंबियांनी तिरोडा पोलिसात धाव घेत या संदर्भात तक्रार नोंदवली.सोबतच त्यांच्या मोबाईल वर फोन केला मात्र तरी देखील ते फोन उचलत नसल्याने आज सकाळी मिलमध्ये जाऊन पाहणी केली असता गोडाऊन मध्ये त्यांचा मृतदेह सांशयितरित्या आढळून आले. रहागंडाले काही दिवसापासून व्ययवसायिकतेतील तोट्यामुळे तणावात राहत असल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागंडाले यांनी सुध्दा घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रहांगडालेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करिता तिरोडा उप जिल्हा रुग्णालयात हलविले.उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटूंबियाना सोपवले. रहांगडाले यांच्या खैरबोडी गावात हि वार्ता पोहचताच खळबळ उडाली. तिरोडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.सायकांळी खैरबोडी येथील स्मशानभूमित त्यांच्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्ययंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाबद्दल आमदार विजय रहागंडाले यांनी शोक सवेंदना व्यक्त केली असून भारतीय जनता पक्षासह तिरोडा तालुक्यात त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version