नवेगावबांध फाउंडेशनने खासदार सुनील मेंढेंना दाखविले काळे झेंडे

0
34

गोंदिया: जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची देखरेखीची जवाबदारी पार पाडणार्या नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने आज शनिवारला गोंदिया – भंडाराचे खासदार सुनील मेंढे हे नवेगावबांध येथे जलजिवन मिशन कामाच्या भूमिपूजनककरीता आले असता,काळे झेंडे दाखविण्यात आले.खासदार मेंढे यांच्या बांधकाम कंपनीने नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात केलेल्या गार्डनच्या कामाचे लोकार्पण न केल्याचा निषेध म्हणून नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने नवेगावबांध येथील आझाद चौकात काळे झेंडे दाखविण्यात आले.

या संदर्भात नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास बोरकर यांनी सांगितले की नवेगाव बांध पर्यटन संकुल स्थळी सन २००३-०४ या आर्थिक वर्षात गार्डन व कॉन्फरन्स हॉल करिता कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला.सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील सनी कन्स्ट्रक्शन ज्याचे मालक विद्यमान खासदार सुनील मेंढे हे आहेत.असोसिएट अश्फाक अहमद यांच्या मदतीने सदर काम करायचे होते. २००८-०९ या कालीवतीमध्ये काम करण्यात आले.सदर काम करतेवेळी त्या कामात बऱ्याच त्रुट्या आढळून आल्या होत्या. नवेगावबांध संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या कामाचे लोकार्पण करा अन्यथा दोषींवर कारवाई करा एवढीच मागणी होती, आणि या मागणीला धरून नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचा अध्यक्ष या नात्याने लोकायुक्ताकडे दाद मागण्यात आले होते. यामध्ये लोकायुक्ताने जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्यसचिव यांना दोषी ठरविले.त्यावेळी आपण सदर कामाचे लोकार्पण करा किंवा दोषींवर कारवाई करा एवढी मागणी लावून धरली आणी खासदार सुनील मेंढे यांची भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली व त्यांना त्या गार्डनची डागडूजी करून त्याचे लोकार्पण करण्याची विनवणी केली होती.परंतु वर्षा मागून वर्ष लोटून ही नवेगाव बांध येथील त्या गार्डनचे व कॉन्फरन्स हॉलचे लोकार्पण न झाल्याने या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध या ठिकाणी आज शनिवारला आझाद चौक नवेगावबांध येथे खासदार सुनील मेंढे हे जलजीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आले असता आझाद चौक नवेगाव बांध या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आले.