जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांची दवड़ीपार जिल्हा परिषद शाळेला भेट

0
40

गोरेगाव : गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दवड़ीपार येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. पाहणी दरम्यान अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीला केल्या. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भौतिक सुविधेची पाहणी केली. पावसाळा सुरू असून विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पंकज रहांगडाले यांनी केल्या. सोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्य करण्याबाबत गरज पडल्यास तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे आवाहन देखील केले. दरम्यान  डॉ साहेबलाल कटरे,किशोर पारधी, रविन्द्र पटले, श्री. कटरे सरपंच, उपसरपंच, शिक्षक वृंद आणि गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.