
गोंदिया- दादालोरा खिडकी योजना “कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून AOP बोन्डे, पो. ठाणे चिचगड, देवरी तर्फे करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शालेय मुला मुलींसाठी स्कूल बॅग, कंपास बॉक्स, ड्रॉईग बुक, तसेच मुलींसाठी स्किप जंप ( दोरी) इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.तसेच गावांतील महिलांना चहाचे सेट व ट्रे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या हस्ते देण्यात आले.सदर उपक्रमास पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला .
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ” यांचे संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली ” कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत “उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे, यांचे मार्गदर्शनात कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस स्टेशन चिचगड यांचे नेतृ्त्वाखालील सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे येथील प्रभारी अधिकारी पो. उप. नि. राहुल दुधमल, आणि पोलीस अंमलदार यांचेसह अति संवेंदनशील असलेले ग्राम सर्रेगाव येथे पोचून विविध साहित्याचे वितरण केले. गावात फक्त 22 घरे इतकी लोकसंख्या असल्यामुळे सदरचे गाव हे अनेक सुख सुविधा पासून वंचित आहे. तसेच गावांतील ज़िल्हा परिषद शाळेत फक्त 6 मुले असून अंगणवाडी शाळेत 19 मुले आहेत. दादलोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी.सदरचे गाव हे लोक प्रवाहात यावे याकरिता भविष्यातही असेच नव- नवीन उपक्रम सदर गावात घेण्याची विनंती उपस्थीत गावकऱ्यांनी यावेळी केली.उपक्रम हा शांततेत पार पाडण्यात आला. सदरचे कार्यक्रमास गावातील संपूर्ण गावकरी उपस्थीत होते.जिल्हा पोलीस दलातर्फे टीम- कम्युनिटी पोलिसिंग, AOP बोन्डे, पो.स्टे. चिचगड, देवरी तर्फे केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतील मुख्याध्यापक श्री. वासनिक आणि गांवकरी मंडळींनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले..