
उपविभागीय कार्यालय देवरी द्वारे महामहिम राष्ट्रपति च्या नावे निवेदन
देवरी,दि.24-मणिपुर राज्यातील कांगपोकली येथील एका जमावाने दोन आदिवासी महिलांना निर्वस्त्र करीत सामुहिक बलात्कार करून रस्त्यावर धीण्ड काढल्याचा वीडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे,सदर घटना धक्कादायक असून अमानवीय आहे.या घटनेचा देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त केला जात आहे, या घटने बद्दल आदिवासी समाजात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे,सदर घटना 4 मे रोजची असून उघड़ व्हायला ७७दिवस लागले 21 जून ला गावच्या सरपंचने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ही घटनेची वाच्चता फुटायला 2 महीने लागले.
मैतेई समुदायाच्या तब्बल आठशे ते हजार लोकांच्या जमावाने महिलांच्या कुटुंबियांवर हल्ला करत एका महिलेच्या भाऊ व वडीलाची हत्या केली. त्यानंतर निर्वस्त्र व्हा नाहीतर जीवे मारून टाकू असे म्हणत हजारो लोकांच्या जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर धींड काढली व त्यापैकी 21 वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
मणिपुर ची ही घटना उघड़ व्हायला दोन महीने लागले आहे,घटना उघड़ झाल्यानंतर फक्त एका आरोपीला अटक करण्यात आली आहे,यावरून सदर घटना राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच पुलिस प्रशासनाने दाबुन ठेवल्याचाही संशय निर्माण होतो,या घटने बद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत,नैतिकतेची जवाबदारी घेत मणिपुर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा,राज्यात राष्ट्रपति राजवट लागू करावी,तसेच या दोन आदिवासी महिलांवर अमानवीय कृत्य करणाऱ्या त्या जमावातील सर्व आरोपिन्ना तत्काळ अटक करून जलद न्यायालयाने खटला चालवुन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली,तसेच या प्रकरणावर काही तोडगा न निघाल्यास देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ही या वेळी देण्यात आला.
निवेदन देते वेळी एन. एम.गावळ नायब तहसीलदार उपविभागीय कार्यालय देवरी,संदीप भाटिया तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी देवरी, उषाताई शहारे,बळीराम कोटवार,ओमप्रकाश रामटेके,शकील क़ुरैशी नगर सेवक,नितिन मेश्राम नगर सेवक,सुनीता शाहू नगरसेविका, दीपक कोरोटे, कविता वालदे,कुलदिप गुप्ता, अविनाश टेंभरे,सुरेंद्र बंसोड़,अमित तरजुले, अंतरिक्ष बहेकार, प्रशांत कोटाँगले, संदीप महोबिया,राजेश गहाने,ओमराज बहेकार,जैपाल प्रधान, प्रल्हाद सलामे सुभाष मेळे प्रामुख्याने उपस्थित होते.