
■ सहकारी संस्था गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार यांचे आव्हान.
देवरी,ता.२४: केंद्र शासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ – २४, २०२४- २५ व २०२५-२६ या तिन वर्षाच्या कालावधीसाठी शासन निर्णय दि. २६.०६.२०२३ अन्वये अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित पिकांचे नुकसान भरपाई करीता सदर पिक विम्याचा शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. तरी सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ रु. १/- भरणा करुन पिक विमा पोर्टलवर ३१ जुलै पर्यंत आपली नोंदणी करूण घ्यावी असे आव्हान सहकारी संस्था गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव,सालेकसा,
गोरेगाव, गोंदिया, तिरोडा, या तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सभासद यांना पिक विमा नोंदणी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या सर्व शाखामध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी संबधित संस्थेचे गटसचिव / सचिव तथा बँक निरीक्षक यांचेशी त्वरित संपर्क साधून दिनांक ३१/०७/२०२३ पुर्वी आपली पिक विमा नोंदणी पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान शासन परिपत्रकान्वये सहकारी संस्था गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार यांनी केले आहे.#