“यु- विन ” पोर्टल चे तिरोडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा

0
24

नियमित लसीकरण होणार डिजीटल
यु- विन  पोर्टल ची १ ऑगस्ट पासून होणार अंमलबजावणी त्यापुर्वी प्रशिक्षणावर भर 
बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण नोंदी होणार ऑनलाईन
तिरोडा -गरोदर मातांचे व मूल जन्माला आल्यापासुन ते 16 वर्षापर्यंत त्या बालकांचे नियमित लसीकरण करावी लागते. यासाठी महिलांना आरोग्य विभागाकडून माता-बाल संगोपन कार्ड पुरवले जाते. त्यावर लसीकरणाच्या नोंदणी असतात. हे कार्ड जपून ठेवावे लागते. परंतु आता आरोग्य विभागाचे नियमित लसीकरण ऑनलाईन डिजीटल होणार आहे.यासाठी संपूर्ण देशात यु- विन पोर्टल 1 ऑगस्ट पासुन सुरू केले जाणार असून, यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक , माता व बाल संगोपन अधिकारी यांचे नियमित लसीकरण यु- विन पोर्टल बाबतचे  राज्यस्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात दि. 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात यु- विन पोर्टल व मिशन ईंद्रधनुष्य अभियान 5.0 चे जिल्हास्तरिय प्रशिक्षण कार्यशाळा नुकताच संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी , ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, डाटा एण्ट्री ऑपरेटर, तालुका आरोग्य सहाय्यक, जिल्हास्तरिय पर्यवेक्षक उपस्थित होते.
जिल्हास्तर पाठोपाठ आरोग्य विभागाने तालुकास्तरिय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन केले असुन दि. 24 जुलै रोजी तिरोडा येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती घोरमारे , जिल्हा पर्यवेक्षण व सनिंत्रण अधिकारी उकदास बिसेन , जिल्हा शित साखळी व्यवस्थापक मिनाक्षी सयाम व चारही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारि तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी यु- विन पोर्टल व मिशन ईंद्रधनुष्य अभियान 5.0 चे प्रास्तविक सादरीकरण केले. उकदास बिसेन यांनी यु- विन पोर्टल बाबतचे प्रशिक्षण दिले तर  लस व शित साखळी पोर्टलचे सादरीकरण मिनाक्षी सयाम यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती घोरमारे यांनी तिरोडा तालुक्यातील नियमित लसीकरणाचा आराखडा सादर केला.
यु-विन पोर्टल पोर्टलवर मुलांसाठी सर्व प्रकारच्या लसी मिळवण्याबाबत संपूर्ण माहिती असेल. महत्त्वाचे म्हणजे हे आपल्या निवासी जिल्हा व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्हा किंवा राज्यातील रुग्णालयात लसीकरण दिले जावु शकणार आहे. प्रत्येक बालकाचे लसीकरण व्हावे व बाळाचे आरोग्य रक्षण व्हावे याविषयी शासन अत्यंत सतर्क असून लसीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे. या यु-विन पोर्टलची संपूर्ण माहिती होण्याकरिता शासनाच्या वतीने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहे.
गरोदर माता, मुलांचीही नोंदणी होणार ऑनलाईन –
यु-विन पोर्टलवरून गरोदर माता आणि बाळाची लसीकरणाची नोंद ऑनलाईन उपलब्ध होईल. हा रेकॉर्ड यु-विन पोर्टलद्वारे ठेवला जाईल. विशेष बाब म्हणजे यु-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्याच्या लसींची रियल टाईम एन्ट्री केली जाईल. या पोर्टलवर गरोदर माता आणि मुलांची नोंदणी केली जाईल. हे पोर्टल कोरोना काळात लसीकरण करण्यासाठी असलेल्या को-विन पोर्टल प्रमाणेच काम करेल. यु-विन पोर्टल हे आधार कार्ड ची लिंक केली जाईल.
मोबाईलवर येणार संदेश –
कोरोनाच्या काळात लसीकरणानंतर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येत होता. त्याच धर्तीवर या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईल नंबर वर यु-विन पोर्टल द्वारे संदेश येईल आणि लसीकरणाशी संबंधित सर्व तपशील यु-विन पोर्टलवर नोंद केली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याला कोणतेही राज्यात किंवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. पोर्टलवर एका क्लिक द्वारे लसीकरणचा तपशील समजेल.तसेच पुढिल लसीकरणाचा अलर्ट सुद्धा लाभार्थाला मिळणार आहे.
३० जुलैपर्यंत गाव पातळी पर्यंत प्रशिक्षण पोहचविणार –
तालुका स्तरावरील प्रशिक्षणात तालुक्यातील अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका , आरोग्य पर्यवेक्षक , आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यीका, कार्यक्रम सहाय्यक यांचे प्रशिक्षण झाल्या नंतर 25 ते 30 जुलै  कालावधीत चार ही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावपातळी वरील आशा सेविका , अंगणवाडी सेविका व ईतर कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पाडले जाणार आहे.
– डॉ.स्वाती घोरमारे, तालुका आरोग्य अधिकारी

लसीकरण मिळणे हा बाळाचा अधिकार आहे. बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण होते. त्यामुळे पालकांनी जागृत राहुन जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन लसीकरण करुन घ्यावे. गावातील आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्कात राहुन आपल्या बालकाचे लसीकरण करुन त्याचे आरोग्य सुद्रुढ ठेवण्यास सहकार्य करावे.

  • डॉ. दिनेश सुतार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी