
गोंदिया-अमृत महोत्सवानिमित्त उन्मेष हा साहित्यिक कार्यक्रम साहित्य अकादमी दिल्लीचे वतीने दिं 3 ते 6 आगष्ट 2023 पर्यंत भोपाल येथे आयोजित केला आहे.या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात देशविदेशातील 600साहित्यकारांची निवड केलेली आहे.त्यात विविध भाषा व बोलीतून साहित्यकार निवडतात.ऊषाकिरण आत्राम या गोंडी साहित्यिक आहे.त्यांनी आतापर्यंत गोंडी मधुन कथा कविता सादर केलेल्या आहेत.या वर्षांत सुध्दा गोंदिया जिल्ह्य़ाला हा मान मिळाला आहे. आदिवासी जिल्ह्य़ातील जेष्ठ लेखकेची निवड झालेली आहे.त्या गोंडी ,मराठी व हिन्दी मधुन कविता सादर करतील. या पुर्वी त्यांना साहित्य अकादमीने दिल्ली,रांची, मुंबईला बोलाविले होते. तर आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन सिमला व मागील वर्षी त्यांना कोलकात्यात झालेल्या उन्मेष साहित्य संमेलनात बोलाविले होते.
अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या ऊषाकिरण सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी आहेत. सध्या त्या धनेगाव कचारगड या गोंदिया जिल्ह्य़ातील जंगलातल्या लहान गावात राहुन गोंडी हलबी भिली कोरकु कोलाम आदि भाषेवरती भाषा शोध संस्थान धनेगाव येथे काम करतात.त्यांची आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात निवड झाल्याबद्दल मालती किनाके,हेमलता आहाके,प्रा मानीक व मिराताई गेडाम,राहुल हटवार, लखनसिंह कटरे,पवन पाथोडे,किरण मोरे,समाधान नेवारे ह्यांनी अभिनंदन केले.