
संभाजी भिडे : जैन कुशल भवनात जाहीर व्याख्यान
गोंदिया, . हिंदुस्थान बुद्धि, कर्तृत्व, निसर्ग शेती, हवामान, ज्ञान आणि संस्कृती असलेला राष्ट्र आहे. या देशाची आधारशिला संस्कृतीवर अवलंबून आहे. मात्र, येथील हिंदूंनी त्याच्या वापर न करता दुसऱ्यांना आपल्या देशात स्थान दिले. त्यामुळे आजही एकेकाळी स्वयंपूर्ण असलेल्याला देश गुलामीत जगत आहे. या सर्वाला हिंदूच दोषी आहे. देशाची व्यवस्था नालायक हिंदू आणि लबाड मुसलमान अशी झाली आहे, असे प्रतिपादन शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.
आज सोमवारी (ता. 24) शहरातील जैन कुशल भवन येथे आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. संभाजी भिडे पुढे म्हणाले, जगाचा पाठीवर 187 देश आहे. त्यापैकी हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे. हे राष्ट्र, देश, धर्म यांना प्राथमिकता देणारे होते. प्रामुख्याने हा देश हिंदूंचा होता आणि आहे. मात्र, स्थानिकांनी आपला देश, धर्म आणि संस्कृती विसरल्यामुळे त्याचा लाभ इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि मुसलमानांनी घेतला. या देशाला रामायण, महाभारत आणि मराठ्यांचा इतिहास लाभला. मात्र, या ताकदीकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तब्बल आजतागायत 76 राष्ट्रांनी हिंदुस्थानावर आक्रमण केले. बोलणे, जगणे, वागणे या सर्व आमच्या अधिकारांवर पाश्चिमात्य आणि मुस्लिम वृत्तीने कब्जा केला. यामुळे हिंदू धर्माला धोका निर्माण झाला. हिंदुस्थानातील नागरिकांनी इंग्रजी माध्यमांकडून आता मातृभाषेकडे वळणे गरजेचे आहे. देश आणि धर्म प्रथमत: हे ब्रिद अंगीकारणाची गरज आहे. नुसता धारकरी असून चालणार नाही तर धर्मासाठी पुढे येणारा योद्धा निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत संभाजी भिडे यांनी मांडले. याच वेळी काही लांडग्यांनी 1320 वर्षे क्रुरता, कट्टरता आणि अत्याचार करून राज्य केले. त्यांची लबाडी आज ही सुरू आहे. त्यामुळे अश्या लबाडांपासून हिंदूंनी सावध राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.