गोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीने बीडीओच्या कक्षाला लावले कुलूप

0
105

गोंदिया,दि.२६- गोरेगाव पंचायत समितीचे बीडीओ अजितसिंह पवार यांच्या मनमानी कारभार व सततच्या सुट्टी मारुन कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या प्रवृतीचा विरोध करण्याकरीता पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी आज बुधवारला कुलूप लावल्याचे प्रकरण समोर आले आहे.बीडीओ पवार हे गेल्या चारपाच दिवसापासून रजा न घेता पंचायत समिती कार्यालयातून गायब असून त्यांनी आपला भ्रमणध्वनी सुध्दा बंद केल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.सभापती बोपचे यांनी कुलूप लावल्याच्या प्रकरणाला दुजोरा देत पंचायत समितीचे मार्च जुर्ले महिना सपंत आल्यावरही अजून बंद झालेले नाही़.अनेकांचे देयके रखडले तर पंचायत समिती सदस्यासह गटनेत्यांचेही फोन ब्लाक करुन टेवल्याचे सांगितले.