Home विदर्भ डोणी जंगलातील घटना वाघाचा मृत्यू

डोणी जंगलातील घटना वाघाचा मृत्यू

0

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यात एक वाघ व एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना बुधवारी पुन्हा मूल तालुक्यातील डोणी वनपरिक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनांमुळे वाघ वाचविण्याच्या मोहिमेला जबर हादरा बसतो आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर झोनच्या मध्यभागी असलेल्या मूल तालुक्यातील डोणी नं. २ मधील कक्ष क्र. ३४८ व ३३0 च्या जंगलात वनरक्षक डोंगरवार हे गस्तीवर होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांना वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना तत्काळ माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघाचे शरीर सडलेले असल्याने वाघ नर आहे की मादी व मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही.
सदर वाघाचा मृत्यू सहा-सात दिवसांपूर्वी झालेला असावा, असा अंदाज आहे. डॉ. संदीप छौकर, डॉ. खोब्रागडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले.

Exit mobile version