अन्नाभाऊ साठे मातंग समाजाकरिता प्रेरणास्थान –विजय रहांगडाले

0
10

तिरोडा:- तिरोडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रामुक्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रणालीवर प्रकाश टाकत महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारापर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्जफेड 36 ते 60 मासिक हप्त्यात करावी लागते. तांत्रिक व व्यावसायीक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शासनमान्य संस्थांना प्रशिक्षणार्थी देण्यात येतात. प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते बारा महिने असतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मातंग समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदविका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीम कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जाते. दहावी 1 हजार रुपये, बारावी 1 हजार 500 रुपये, पदवी व पदविका 2 हजार रुपये तर अभियांत्रिकी व वैद्यकीयसाठी 2 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती आहे. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन आमदार यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन, उपसभापती हुपराज जमाईवार, मातंग समाज समिती तिरोडा चे अध्यक्ष अजय बावने,उपाध्यक्ष देवानंद ढोके,सचिव राजेन्द्र भाले ,सहसचिव कपिल बावने, सदस्य कबिर कुचेकर, सदस्य देवाजी बावने ,सदस्य राधेश्याम इंगळे ,सदस्य मारोती डोंगरे सनोजजी बावने,आकाशडोंगरे.गोपाल डोंगरे, भोजराज बापने ,विक्की बवने, सुरेश भाले ,बाँबी खडसे,महेंद्र अवचार,यशवंत बावने ,राजहंस शिंदे ,रोशन शिंदे ,रूपेश डोंगरे उपस्थित होते.