
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे) –तालुक्यात नैसर्गिक पाऊस शातक-यांसाठी समाधानकारक पडत आहे.मात्र तालुक्यातील शेकडो तलाव व धरणे अजुन पर्यंत भरलेले नाही.तालुक्यात सिंचनासाठी आत्मा असलेले ईटियाडोह व नवेगावबांध धरण अजुनही तुडुंब भरले नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
अर्जुनी मोर तालुक्यात यावर्षी शेतीचा हंगाम सुरळीत आहे.कोणत्याच शेतक-यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले नाही. तालुक्यात यावर्षी समाधानकारक व शेतीयुक्त पाऊस पडत असल्याने शेतीचे कामे सुरळीत पार पडत आहे.सध्या तालुक्यात रोवणीचे काम जवळपास आटोपले आहेत. अर्जुनी मोर. तालुक्यात 257 मालगुजारी तलाव असुन या तलावापासुन 5019.61 हेक्टर आर.शेतजमिनीला सिंचन होते.तर लघु पाटबंधारे व जिल्हा परिषद चे शेकडो तलाव बोड्या असुन त्यामधुनही हजारो हेक्टर शेत जमीनीला सिंचन होते.तर तालुक्याचे भुषण असलेले ईटियाडोह व नवेगावबांध तथा सिरेगांवबांध जलाशयातुनही हजारो हेक्टर शेत जमीनीला सिंचनाची व्यवस्था होते.शेकडो शेतक-यांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहीरी व बोअरवेल्स खोदल्या आहेत.सिंचनासाठी परिपूर्ण व्यवस्था तालुक्यात असली तरी यावर्षी शेतीयुक्त पाऊस पडत असला तरी तलाव बोड्या व धरणात अजुनही जलसाठा कमी असल्याने ओवरप्लो झाले नाही. दरवर्षी तालुक्यात ऑगस्ट महिन्यात बहुतांशी तलाव बोड्या व ईटियाडोह व नवेगावबांध धरण ओवरप्लो होतात.आज ऑगस्ट महिणा अर्ध्यावर आला असला तरी तलाव बोड्या व धरणात अजुनही जलसाठा कमी असल्याने ओवरप्लो झाले नाही. ईटियाडोह धरण 77.41 भरला असल्याची माहिती आहे. तालुक्यात शंभर टक्के रोवणीचे कामे आटोपली आहे.नैसर्गिक पावसामुळे शेतीची सर्व कामे आटोपली आहेत. धान उत्पादनाला सर्वाधिक पाणी लागतो.रोवनीनंतरही मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते.ऑगस्ट महीण्यानंतर पाऊस पडण्याचा ओघ कमी असतो .अशावेळी शेतकरी तलाव बोड्या व धरणातील पाणीसाठ्याने शेतीचे सिंचन करतात.अशावेळी तलाव बोड्या व धरणात अजुनही जलसाठा कमी असल्याने सध्यातरी शेतकरी तनावात आहे.