आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
21

अर्जुनी मोर-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या योजनेमधून अर्जुनी /मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, कान्होली, जांभळी/ये, बाराभाटी या गावामध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

यामध्ये नवेगाव बांध येथे समाधान हॉटेल ते रुपेश कापगते यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, कान्होली येथे कुमार दोनोडे ते कैलास हेमने यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, नाग मंदिर जवळ सभामंडप, जांभळी/ए येथे जि.प. शाळे पासून ते सदाशिव पुस्तोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, बाराभाटी येथे सदाशिव चुलपार ते योगेश चाकाटे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम तसेच दिनेश जोशी ते हरी आंद्रे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम असे एकूण ५० लक्ष रुपयाचे कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी होमराज पुस्तोडे, उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, हिराताई पंधरे सरपंच नवेगावबांध ,रमण डोंगरवार उपसरपंच नवेगावबांध, गणेश ताराम सरपंच जांभळी, अनिल पुस्तोडे उपसरपंच जांभळी, छायाताई आमले सरपंच कान्होली, जागेश्वर मध्ये उपसरपंच कान्होली, महादेव प्रधान सरपंच बारभाटी, किशोर बेलखोडे उपसरपंच, राकेश पहिरे, संपत बनसोड, डीलेश्वरी वाघमारे, सरस्वती चाकाटे, श्रावणजी मेंढे, प्रेमदास तिरपुडे, पितांबर काशीवार, परेश उजवणे, सुरेखाताई येडाम, लीलाधर काशिवार , श्रीराम ताराम, बुधराम कोरे, कैलास हेमने, चक्रधर हेमने, सतीश वाढई, रतिराम कुंभरे, जितेंद्र कापगते, नीलकंड भोयर , नरेश हुमे, हेमलता गावड, अनिल रुखमोडे, नामदेव डोंगरवार, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.