– रुपचंद ठकरेले यांची मागणी
गोंदिया(ता.8) मागच्या दोन वर्षापासून गोंदिया तालुक्यातील इर्री-नवरगाव (खुर्द), इर्री-नवरगाव (कला) हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.रस्ता खराब असल्यामुळें या रस्त्यावर दररोज अपघात घडून येत आहेत.असे असले तरी या रस्त्याची प्रशासना तर्फे अजूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी पूर्व पंचायत समिती सदस्य रूपचंद ठकरेले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अत्यंत वर्दळीचा रस्ता म्हणून या मार्गाची ओळख आहे. कातुरली, मोहगाव, करंजी, मोरवाही, कालीमाती,भोसा या भागातील नागरिक गोंदियाला येण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करीत असतात. दररोज हजारो प्रवासी या रस्त्यावरून येणे जाणे करीत असतात.असे असले तरी हा रस्ता मागच्या दोन वर्षापासून अत्यंत बिकट झालेला आहे. सदर मार्ग दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिकांनी अनेक निवेदने प्रशासनाकडे दिली. मध्यंतरी जि. प.च्या निवडणुकी काळात इररी येथिल तत्कालीन प्रभारी सरपंचाने या रस्त्यावर मुरूम टाकून स्वतःची पाठ थोपाटण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुका झाल्यानंतर या मार्गाला “जैसे थे वैसे” दिन परत आले.हा संपूर्ण रस्ताच खडेमाय असल्यामुळे चालावे कुठून हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.जागोजागी खड्डे अस ल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.सोबतच नवरगाव कला या मार्गाची स्थीती सुध्दा अत्यंत बिकट झालेली आहे. हे दोन्ही मार्ग दुरुस्तीसाठी अनेकदा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली परंतु बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.कदाचित एखादी मोठी दुर्घटना घडण्याची तर प्रशासन वाट पाहत नाही ना? असा आरोपही प्रसिद्धी पत्रकातनमूद लावण्यात आला आहे. जिल्यातील लोकप्रिनिधींनी या मार्गावरून एकदा तरी प्रवास करुन पहावा अशी मागणी ही या भागांतील नागरिक करीत आहेत.नागरिकांचे हित लक्षात घेता हा मार्ग त्वरित दुरुस्त करुन द्यावा अन्यथा इर्री ग्रामवाशी रस्त्यावर उतरतील असा इशाराही रुपचंद ठकरेले यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.