
गोरेगाव-महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीची सभा, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गोरेगाव येथे संपन्न झाली.सभेत को. -आप. बँकेचे डायरेक्टर रेखलाल टेंभरे मार्गदर्शन करताना म्हणाले गोरेगाव तालुका स्तरावर शेतीत व इतर स्थानिक स्तरावर उपलब्ध साधनांचा योग्य आणि नियोजन बद्ध नियोजनाच्या आधारे भात शेती शिवाय शेतीत तेलबिया व कडधान्यांची लागवड ही आर्थिक समृद्धीचे व रोजगाराचे मोठे निमित्त ठरू शकते. गोरेगाव तालुक्यात मोठे वनक्षेत्र उपलब्ध आहे. त्यात वनऔषधी व विविध वनउपजांनी समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणात रानभाज्या उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील युवकांनी व शेतकऱ्यांनी त्यानुसार व्यवसायाची दिशा निश्चित केल्यास त्यांना रोजगाराची संधी आणि त्यातून आर्थिक सक्षमता मिळविता येईल असे प्रतिपादन शेतकरी व सहकार नेते रेखलालभाऊ टेंभरे यांनी केले.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समिती सभा गोरेगाव येथे आयोजित तालुका कृषी अधिकारी गोरेगाव द्वारा आयोजित सभेत उपस्थित तालुका कृषीअधिकारी पाटोळे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी आघाव साहेब, तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्ष सौ. चित्रकला चौधरी, पीक विमा प्रतिनिधी संजय ठाकरे, मा. कृषी अधिकारी श्री मेंढे साहेब, शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य डॉ.साहेबलाल कटरे, माझी पं. स. उपसभापती सुरेंद्र बिसेन, सदस्य विनोद पटले, अशोक काठेवार, कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र बिसेन, आशिष बघेले, प्रगतिल शेतकरी पटलेजी, राकेश नागपुरे कृषी सहाय्यक, गजानन पटले, रामलाल कटरे, हरिणखेडे मॅडम व तालुक्यातील प्रगत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.